Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Diwali Lakshmi Pujan : दिवाळीला मुंबईतील प्रसिद्ध देवी लक्ष्मीच्या 3 मंदिरांना भेट द्या

Diwali Lakshmi Pujan : दिवाळीला मुंबईतील प्रसिद्ध देवी लक्ष्मीच्या 3 मंदिरांना भेट द्या
, गुरूवार, 31 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)
आता काही दिवसातच दिवाळी सुरु होईल. तसेच लक्ष्मीपूजन दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. मान्यता आहे की, दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास धनप्राप्ती होते. व माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव सोबत राहतो. अनेक जण दिवाळी निमित्त फिरायला जातात. याकरिता आज आम्ही तुम्हाला मुंबई मधील तीन जागृत महालक्ष्मी मंदिर सांगणार आहोत. दिवाळीला लक्ष्मी पूजन दिवशी नक्कीच भेट द्या. 
 
मुंबा देवी मंदिर-
हे मंदिर मुंबईमध्ये भूलेश्वर येथे स्थित आहे. तसेच मुंबई मधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. मुंबा देवी ही मुंबईची देवी आहे. मुंबई हे नाव मुंबा देवी वरून मिळालेले आहे. या मंदिराचा इतिहास 400 वर्ष जुना सांगितला जातो. या मंदिरामध्ये देवी मुंबा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वाहनावर स्वार होते. तसेच या मंदिरात दररोज सहा वेळेस आरती केली जाते. मुंबा देवीला धन आणि ऐश्वर्याची  देवी मानले जाते. या मंदिरात दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येतात. हे मुंबई मधील एक प्रसिद्ध मंदिर आहे. 
 
श्री महालक्ष्मी मंदिर-
हे मंदिर विले पार्ले पूर्व मध्ये सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे. देवी महाकाली आणि महासरस्वतीला समर्पित या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी दुरदुरून भक्त येतात. मंदिराच्या चारही बाजूंनी मूर्ती ठेवण्यात आल्या आहे. याला मुंबई मधील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक दीर मानले जाते. या मंदिरात तीन देवी आहे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. दिवाळीत इथे महापुजा देखील केली जाते. 
 
महालक्ष्मी मंदिर कुर्ला-
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित या मंदिरात वातावरण थंड राहते. तसेच मंदिर अत्यंत सुंदर असून आकर्षक आहे. या मंदिराच्या मुख्य द्वारावर सुंदर नक्षीकाम आहे. तसेच मंदिर ऐतिहासिक असल्याबरोबर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. मंदिरातील लक्ष्मीच्या मूर्तीला सोने आणि चांदीने सजवले जाते. तसेच हे मंदिर मुंबई मधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज