Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळ सांगली

Sangli fort
, गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)
महाराष्ट्रातील सांगली हे एक प्रमुख आणि सुंदर शहर आहे. तसेच या शहराच्या जवळ पर्यटनकरिता अनेक अद्भुत जागा आहे. ज्यांना तुम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये नक्कीच भेट देऊ शकतात. 
 
तसेच सांगलीमधील हळद आणि हळद बाजार पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. सांगलीचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. कृष्णा नदीच्या किनार्यावर वसलेल्या या शहराच्या चारही बाजूंनी हिरवळ आहे. आज आपण पाहूया सांगली शहराजवळ असलेले सुंदर पर्यटनक्षेत्रे जे त्यांच्या सौंदर्याने नक्कीच भुरळ घालतात. 
  
दंडोबा हिल्स अँड फॉरेस्ट प्रिजर्व-
तुम्ही जर सांगलीमध्ये फिरायला आलात तर दंडोबा हिल्स अँड फॉरेस्ट प्रिजर्व येथे नक्की भेट द्या. हे फॉरेस्ट कमीतकमी 28 किमी पर्यंत पसरलेले आहे. दंडोबा हिल्स अँड फॉरेस्ट प्रिजर्व निसर्गप्रेमींकरिता स्वर्ग मानला जातो. कारण येथे चारही बाजूंनी हिरवळ आहे. दंडोबा फॉरेस्टचे शांत वातावरण आणि मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करते. दंडोबा हिल्स इथे अनेक पर्यटक ट्रेकिंग करण्यासाठी येतात. 
 
सिद्धेवाडी धबधबा-
सांगलीमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे सिद्धेवाडी धबधबा होय. तसेच या धबधब्याला सांगली धबधबा म्हणून देखील ओळखले जाते. सिद्धेवाडी धबधबा 50 फूट उंचावरून कोसळतो. या धबधबा जवळील हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. तसेच पावसाळा आणि हिवाळा या धबधब्याच्या सौंदर्यात वाढ होते. 
 
बाहुबली हिल मंदिर- 
सांगली मध्ये असलेले बाहुबली हिल मंदिर एक जैन स्थळ आहे. हे स्थळ सांगली आहे आसपासच्या परिसरात पवित्र स्थळ मानले जाते. या प्राचीन प्रसिद्ध मंदिरामध्ये संत बाहुबलीची 28 फूट उंच मूर्ती आहे.  जिला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक पर्यटक सांगलीमध्ये दाखल होतात. बाहुबली हिल मंदिर पर्यंत पोहचण्यास कमीतकमी 400 पायऱ्या चढाव्या लागतात.  
 
कृष्णा नदी- 
सांगली शहर हे कृष्णानदीच्या काठावर वसलेलं आहे. कृष्णा नदी ही महाराष्टाची जलवाहिनी मनाली जाते. कृष्णा नदीचे सौंदर्य अनेक पर्यटकांना भुरळ घालते. धकाधकीच्या जीवनातून वेळ कडून कृष्णा नदीवर नक्कीच फिरायला जा. तसेच शांत निसर्गाचा आनंद घ्या. 
 
सांगली किल्ला-
सांगली मधील किल्ला हा सांगलीचे मुख्य आकर्षण आहे. तुम्हाला जर सांगलीचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास सांगली मधील किल्ल्याला नक्कीच भेट द्या. सांगली किल्याचे निर्माण 19 व्या शतकामध्ये श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन प्रथम यांनी केले होते. हा किल्ला गोलाकार आकारामध्ये बनवण्यात आला आहे. विकेंड पिकनिक करीत देखील तुम्ही इथे येऊ शकतात. 
 
प्रेक्षणीय स्थळ सांगली जावे कसे? 
सांगली महाराष्ट्रातील प्रमुख स्थळ असून, सांगलीला रेल्वे मार्गाने आणि रस्ता मार्गाने सहज पोहचता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येथे झाला भगवान राम आणि माता सीता यांचा स्वयंवर, नौलखा मंदिर जनकपूर