Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धबधबा कर्जतचा

Webdunia
कर्जतचा धबधबा हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. सर्वत्र पावसाळा सुरुवात झाल्यापासून निसर्गाची हिरवी शाल आणि धबधबंचा पांढरा शुभ्र पदर पर्यटकांना खुणावू लागतो. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादी ठिकाण्याच्या पर्यटकांनी आपला मोर्चा कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कर्जतच्या धबधब्याकडे वळविला आहे.
 
पावसाळी पिकनिकमुळे कधी न भेटणारे मित्रदेखील एकत्र येतात. कर्जत तालुक्यातील मोहिली, सोलनपाडा, टपालवाडी, आनंदवाडी, कोला धबधबा अशा अनेक निसर्गरम्य ठिकाणच्या धबधब्यांवर तरुण एकत्र जमतात. अशा प्रसिद्ध ठिकाणी तरुणांची हमखास गर्दी पाहावास मिळते. मागील वर्षी पहिलच आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात करून तो धो-धो कोसळत होता. यावर्षीही पावसाने जोरदार सुरुवात केल्याने कर्जतच्या धबधब्याककडे पर्यटक धाव घेत आहेत.
 
पावसाळ्यात कर्जतच्या डोंगरकपार्‍यातून वाहणार्‍या धबधब्यांची ओढ पर्यटकांना असते. हवा तेवढा पाऊस पडला नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. परंतु पावसाने जोरदार सुरुवात केल्याने मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणांहून पर्यटक येत आहेत.
सहलीची मजा अनुभवण्यासाठी महाविद्यालयातील तरुण-तरुणींप्रमाणे अनेक सोसाटीतील मित्र-मैत्रिणी, कंपनीतील कर्मचारी, नातेवाईक, ज्येष्ठसुद्धा सामील होत असतात. यावर्षी पिकनिकला जाण्यासाठी अनेकांनी नियोजन केले असल्याचे दिसून आले. धबधब्यांवर येणार्‍या पर्यटकांनी इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेऊन मगच मौजमजा करावी. मद्यपान करून पाण्यात उतरू नये, असे आवाहन स्थानिक, वनविभाग आणि पोलिसाकडून करण्यात येत  असते.
 
म. अ. खाडिलकर 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जाणारा युरोपमधील एक छोटासा देश पोलंड

लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

पुढील लेख
Show comments