Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमळनेरच्या मंगळग्रह मंदिराचे हे वैशिष्ट्ये, एकदा अवश्य भेट द्या

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (07:50 IST)
अमळनेर येथील श्री मंगळ देवतेचे स्थान हे प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. येथे मंगळवारी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे त्यांचा मंगळ दोषही शांत होतो आणि मंगळ देवाच्या कृपेने मनोकामनाही पूर्ण होतात. या ठिकाणाविषयीच्या 10 मुख्य गोष्टी जाणून घेऊया.
 
1. मूर्ती अप्रतिम: येथे मंगळ देवाची मूर्ती पौराणिक स्वरुपात आहे. या देशात जगातील एकमेव अशी मूर्ती आहे जी मंगळदेवाच्या रूपात आहे. मंगळदेवाच्या मूर्तीवर नुकतेच वज्रलेप करण्यात आले आहे. येथे 'भूमाता' आणि 'पंचमुखी हनुमान' यांच्या मुरत्या देखील आहेत. जगातील पहिले भूमाता मंदिर येथे असल्याचे मानले जाते. भूदेवी म्हणजेच भूमातेचे नाते मंगळ देवाशी असून यांचे येथे एकत्र दर्शन घेण्याचा लाभ मिळतो.
 
2. पालखी: अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दर मंगळवारी काढण्यात येणारी पालखी मिरवणूक हजारो भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्री मंगळग्रह मंदिराच्या प्रांगणातून मंगळाची पालखी मिरवणूक काढण्यात येते. सुरुवातीला विविध फुलांनी सजवलेली पालखी मंदिरासमोर अतिशय आकर्षक रांगोळीच्या जागी ठेवली जाते. आकर्षक वेशभूषा केलेले भाले, चोपदार, श्री मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष, मंदिराचे विश्वस्त आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीतील मंगळ देवाच्या मूर्तीचे व पादुका यांचे यजमानांकडून मंत्रोच्चार करून पूजन केले जाते. त्यानंतर पालखीचे प्रस्थान होते.
 
3. येथील प्रसाद अद्वितीय आणि स्वादिष्ट : मंगळ देवाच्या मंदिरात दोन प्रकारचे प्रसाद उपलब्ध आहेत. सर्वप्रथम मंदिर संस्था पूजा आणि आरतीनंतर मोफत प्रसादाचे वाटप करते, जो पंचामृतासह पंजिरी प्रसाद आहे. याशिवाय इतर प्रकारचा प्रसाद मंदिराबाहेर मिळतो. मंगळदेवाला फुले, नारळ इत्यादींचा प्रसाद वाहायचा असेल तर हा प्रसाद मंदिराबाहेरून माफक दरात मिळेल. प्रसादाचे दोन्ही प्रकार अतिशय चवदार आणि अप्रतिम आहेत. मंदिराच्या आवारातच तुम्ही रेवा महिला गृह उद्योगाने बनवलेले स्वादिष्ट पेढे प्रसाद म्हणून घेऊ शकता. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास इथल्या दुकानांतून माफक दरात गूळ आणि पांढरे तीळ मिळू शकतात, तसेच केशरी रंगाच्या गोडशेव हा प्रसाद नक्की घ्या. हा एक अतिशय चवदार प्रसाद आहे जो कधीही खराब होत नाही.
 
4. मंगळदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी लांबून लोक येतात: अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात मंगळवारी मंगळदेवाची विशेष पूजा केली जाते. जो कोणी मांगलिक असेल व मंगळ दोषाने पीडित असेल त्याने येथे अभिषेक- पूजा केल्याने मंगळ शांती होते. येथे दर्शन, पूजा आणि अभिषेक करण्यासाठी लांबून लोक येतात. मंगळाची पूजा केल्यानंतर वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही.
 
5. रोग दूर होतात: जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला कुठलाही आजार असेल तर तुम्हाला मंगळदेवाचा आशीर्वाद अवश्य घ्यावा, कारण मंगळदेव हे सर्व रोग दूर करणारे देव आहेत. दूरवरून लोकही आपल्या नातेवाईकांच्या आरोग्याची कामना करण्यासाठी येथे येतात. यासाठी येथे विशेष पूजा केली जाते.
6. मंगळदेव हे या लोकांचे दैवत : जर तुम्ही शेतकरी, अभियंता, बिल्डर, दलाल, पोलिस, शिपाई किंवा राजकारणी असाल तर तुम्ही मंगळदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतलेच पाहिजे कारण ते या भागाचे दैवत आहे. या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर मंगळदेवाला प्रसन्न करण्यासाठी येथे मंगळवारी विशेष पूजा-अर्चा केली जाते. या दिवशी मंगळदेवाची मिरवणूकही काढली जाते, जी अतिशय सुंदर असते.
 
7. नैसर्गिक ठिकाण: मंदिर परिसरातच सुंदर बागा आणि नैसर्गिक ठिकाणे आहेत. हे पिकनिक स्पॉट आणि पर्यटक म्हणूनही लोकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
 
8. भोजन व मुक्कामाची व्यवस्था : मंदिर परिसरात भाविकांची राहण्याची, मुक्कामाची व दर्शनाची योग्य व्यवस्था आहे. यासोबतच माफक दरात जेवणाचीही उत्तम व्यवस्था आहे. तुम्ही फक्त रु.54 मध्ये स्वादिष्ट आणि पोटभर जेवण घेऊ शकता. मंदिराच्या आत आणि बाहेर कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
 
9. व्हीआयपी दर्शन नाही : विशेष म्हणजे येथे कोणत्याही प्रकारचे व्हीआयपी दर्शन नाही. मंगळदेवाचे दर्शन घेण्यासाठी सर्व भाविकांना रांगेत उभे राहावे लागते. या मंदिरात कोणीही लहान किंवा मोठा नाही.
 
10. श्री मंगल देव मंदिर अमळनेर महाराष्ट्रात कसे पोहोचायचे | How to Reach Mangal Grah Mandir Amalner
 
विमानाने - सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद आहे जे 135 किमी अंतरावर आहे.
 
ट्रेनने - पॅसेंजर, मेमू, एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्या अमळनेर शहर येथे थांबतात
 
रस्त्याने - जळगाव ते मंगल ग्रह मंदिर, अमळनेर : 56 किमी तर धुळे ते अमळनेर : 39 किमी
 
पूरा पता है- मंगळ ग्रह मंदिर, चोपडा रोड, धनगर गल्ली, अमळनेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र-425401 | Mangal Grah Mandir, Chopra Rd, Dhangar Galli, Amalner, Maharashtra 425401

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

Ganpati Aarti जयदेव जयदेव जयजय गजवदना

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments