Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते आज मुंबईला धडक देणार, आझाद मैदानात ठिय्या आंदोलन

Webdunia
सोमवार, 14 डिसेंबर 2020 (08:43 IST)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते सोमवारी मुंबईला धडक देणार आहेत. राज्य शासनाने सुरू केलेल्या नोकर भरतीविरोधात मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागत नाही, तोपर्यंत नोकरभरतीला स्थगिती देण्याची मागणी करत राज्य समन्वयकांनी विधानसभा अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलनाची हाक दिली होती. दरम्यान, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी शहराची नाकाबंदी केली.
कोल्हापूर, नाशिकसह विविध जिल्ह्यांत आंदोलकांची धरपकड सुरू झाल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या महामुंबईतील समन्वयकांनी सोमवारी आणि मंगळवारी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
महामुंबईचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले की, नोकर भरतीला मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध आहे. या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी शासनाकडे वेळ मागितली आहे.  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोमवारी चर्चा होणार आहे. तूर्तास तरी महामुंबईतील समन्वयक नोकर भरतीविरोधात आझाद मैदानात ठिय्या आंदोलन करतील.
 
 सोमवारी अधिवेशनात उपस्थित राहणार्‍या आमदारांची भेट घेऊन आपल्या मागण्या पुढे रेटण्याचा निश्‍चय मराठा क्रांती मोर्चातील महामुंबईमधील समन्वयकांनी केला. मात्र अधिवेशनात यावेळी पास मिळणार नसल्याची माहिती मिळाल्याने आता मंगळवारी दक्षिण मुंबईत आमदारांची तातडीची बैठक आयोजित करण्याचे नियोजन मराठा क्रांती मोर्चाने केले आहे. आमदारांच्या या महत्त्वाच्या बैठकीत मोर्चाची पुढील रूपरेषा ठरणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: शरद पवार पक्षातील नेते गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

शरद पवार गटाला मोठा धक्का, गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

सोलापूरच्या 12 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका एआयने तपासल्या

PBKS vs LSG : आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्यांदा एकमेकां समोर येणार

KKR vs RR: आयपीएल 2025 मधील 53 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments