Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
, बुधवार, 9 डिसेंबर 2020 (16:53 IST)
मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाकडून आणखी एक धक्का मिळाला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. त्यात स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीलाही परवानगी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. 
 
महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी विविध उदाहरणं देऊन मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली. पण सध्या या प्रकरणात कोणतीही सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला. मराठा आरक्षणाचं प्रकरण हे गंभीर आणि मोठं आहे. त्यामुळे याबाबत विस्तृत सुनावणीच केली जाईल, असं कोर्टाने यावेळी नमूद केलं आहे.
 
मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचं आणि नोकर भरतीबाबत होत असलेल्या नुकसानीचा विषय अॅड. मुकूल रोहतगी यांनी कोर्टासमोर उपस्थित केला. त्यावर कोर्टाने आम्ही कोणतीही भरती थांबविण्याचा निकाल दिलेला नाही. पण मराठा आरक्षणानुसार ही भरती करता येणार नाही, असं म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

UEFA चॅम्पियन्स लीगमधील वर्णद्वेष: PSG आणि इस्तंबूल बासाकशीरच्या सामन्यादरम्यान वर्णद्वेषावरून भाष्य, खेळाडूंनी मैदान सोडले, सामना पुढे ढकलला