Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्कॅल्पवर कोंडा झाल्याने खाज येते, या टिप्स अवलंबवा

Dandruff on the scalp causes itching
, बुधवार, 8 डिसेंबर 2021 (22:49 IST)
हिवाळ्यात कोंड्याची तक्रार बहुतेक लोक करतात. अशा स्थितीत डोक्याला खाज येणे, केस लवकर तेलकट होणे अशा समस्या उद्भवतात. हे कोरड्या आणि फ्लॅकी स्कॅल्पमुळे होते. कोंडा हा बर्‍याच लोकांच्या केसात इतका असतो की तो कपड्यांवर पडू लागतो . जर आपल्या सोबतही असे होत असेल तर आज आम्ही काही टिप्स  सांगणार आहोत, ज्याला अवलंबवून आपण या डोक्यातील कोंडा आणि खाज पासून सुटका करू शकता.
 
कोंडा होणं -कोंडा हळूहळू सुरू होतो, जरी सुरुवातीला तो लक्षात येत नाही. पण ते वाढले की डोके खाजायला लागते आणि केस गळतात. काही वेळा कोंडामुळे संसर्ग पसरण्याचा धोकाही असतो. डोक्यातील कोंडा दूर करायचा असेल तर सांगितल्याप्रमाणे या तेलाचा वापर करा. 
 
त्यासाठी साहित्य -
खोबरेल तेल, व्हिटॅमिन ई, कढीपत्ता, कापूर. 
 
तेल असे बनवा- 
हे तेल बनवण्यासाठी प्रथम गॅसवर लोखंडी कढई ठेवा. नंतर त्यात एक वाटी खोबरेल तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता आणि कापूर घाला. दोन मिनिटे मंद आचेवर तेल चांगले गरम केल्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड होऊ द्या. तेल थोडे कोमट राहिल्यावर त्यात व्हिटॅमिन ईच्या काही कॅप्सूल टाका. हे तेल एका बाटलीत भरून ठेवा. 
 
कसे वापरायचे 
डोक्यातील कोंडा हे कमकुवत स्कॅल्प चे लक्षण आहे. केसांना तेल लावण्यासाठी बोटांमध्ये तेल घेऊन ते स्कॅल्पला चांगले लावा आणि मसाज करा. मसाज केल्यानंतर थोडे अधिक तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. असे केल्याने केसांमधील कोंडा साफ होईल.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किचन सिंकमधून येणाऱ्या वासाने हैराण झालात, सिंक सुगंधित करण्यासाठी या टिप्स अवलंबवा