Publish Date: Thu, 12 Nov 2026 (05:06 IST)
Updated Date: Wed, 11 Nov 2026 (17:17 IST)
हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा जास्त कोरडी पडते. याचे मुख्य कारण म्हणजे थंडीतील कोरडी हवा, अंघोळीसाठी वापरलेले जास्त गरम पाणी आणि केमिकलयुक्त साबण. गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे त्वचा ताणली जाते, रुक्ष होते आणि त्याला खाज सुटू लागते. अंघोळीनंतर त्वचा मऊ, चमकदार आणि ओलसर ठेवण्यासाठी खालील सोपे घरगुती उपाय नक्की करून पाहा:
१. अंघोळीच्या वेळी आणि नंतर करायचे सोपे उपाय
अति गरम पाणी टाळा: अंघोळीसाठी खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.
'३ मिनिटांचा नियम' : अंघोळ झाल्यानंतर त्वचा पूर्ण कोरडी न करता, हलकी ओलसर असतानाच (३ मिनिटांच्या आत) मॉइश्चरायझर किंवा तेल लावा. यामुळे त्वचेतील ओलावा आतच लॉक होतो.
सौम्य साबण वापरा: जास्त फेसाळणारे आणि तीव्र सुगंध असणारे साबण टाळा. त्याऐवजी ग्लिसरीनयुक्त, मॉइश्चरायझिंग किंवा आयुर्वेदिक साबण वापरा.
टॉवेलने त्वचा रडू नका: अंघोळीनंतर टॉवेलने त्वचा जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने टॅप (Pat dry) करा.
२. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी नैसर्गिक पर्याय
खोबरेल किंवा बदाम तेल: अंघोळ झाल्यानंतर लगेचच ओल्या शरीरावर खोबरेल तेल किंवा बदाम तेलाचे २-३ थेंब लावा.
कोरफडीचा गर : आंघोळीनंतर कोरफडीचे जेल लावल्याने त्वचेला थंडक आणि नैसर्गिक ओलावा मिळतो.
बॉडी लोशन / मॉइश्चरायझर: शिया बटर किंवा कोको बटर युक्त मॉइश्चरायझर हिवाळ्यासाठी उत्तम मानले जाते.
अंघोळीच्या पाण्यात तेलाचे थेंब: अंघोळीच्या बाल्टीतील कोमट पाण्यात १ चमचा खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल टाका. यामुळे त्वचा अंघोळ करतानाच मऊ होते.
३. अंतर्गत पोषणासाठी महत्त्वाच्या सवयी
पुरेसे पाणी प्या: हिवाळ्यात तहान कमी लागते, पण त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी दिवसभरातून किमान ८-१० ग्लास पाणी नक्की प्या.
तिळ आणि गूळ: आहारात तीळ, गूळ, बदाम आणि तुपाचा समावेश करा. हे पदार्थ शरीराला आतून पोषण देतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.