उन्हाळा आला की त्वचेवर उष्णतेमुळे घामोळ्या किंवा पुरळ होतात आणि त्या त्रासाने सर्व वैतागतात कारण आहे या मुळे खाजआणि जळजळ होणे.या साठी बरेच प्रकारचे उत्पादन बाजारात उपलब्ध असतात पण ते वापरल्याने काही आराम मिळत नाही. आम्ही आपल्याला काही घरगुती उपाय सांगत आहोत हे उपाय अवलंबवल्याने आपल्याला या घामोळ्यांपासून काही दिवसातच आराम मिळेल. चला तर मग जाणून घेऊ या.
* चंदन पावडर पेस्ट - चंदनाची पेस्ट बनवून लावल्याने चंदनातील मॉइश्चराइजिंगचे गुणधर्म त्वचेला थंडावा देऊन उष्णता कमी करण्यासह घामोळ्यामुळे होणारी खाज आणि सूज कमी करते. चंदन पावडर पाणी किंवा गुलाब पाण्यात समप्रमाणात मिसळून पेस्ट बनवा आणि घामोळ्या असलेल्या भागावर लावा. दररोज दोन वेळा या पेस्टचा वापर केल्याने घामोळ्या नाहीश्या होतील.
* बेकिंग सोडा - बेकिंग सोडा घामोळ्याचा नायनाट करण्यासाठी प्रभावी आहे. हे मृत पेशी आणि इतर घाण दूर करते.या मधील अँटी इंफ्लिमेंटरी गुणधर्म खाज होण्यापासून आराम देत.ही खाज घामोळ्यांमुळे होते. या साठी अर्धा कप बेकिंग सोडा पाण्यात मिसळा .या सह लव्हेंडर तेलाच्या तीन ते चार थेंबा अंघोळीच्या पाण्यात मिसळा. याचे अँटी फंगल गुणधर्म त्वचेचे छिद्र स्वच्छ करण्यास मदत करतात.
* कोरफड जेल - जखम भरण्यासाठी आणि अँटी इंफ्लिमेंटरी गुणधर्माने समृद्ध असणारे कोरफड जेल आपल्या शरीराची उष्णता कमी करून थंडावा देण्याचे काम करतो.अति उष्णतेमुळे घामोळ्या होतात. घामोळ्यांचा नायनाट करण्यासाठी कोरफड जेल खूप प्रभावी आहे. या साठी कोरफड जेल काढून संसर्ग झालेल्या त्वचेवर लावा. घामोळ्या नाहीश्या होतील.
* काकडी- व्हिटॅमिन ए ,व्हिटॅमिन सी,पोटॅशियम,केल्शियम सारख्या पोषक घटकाने समृद्ध काकडी शरीराला थंडावा देते. घामोळ्यांपासून शरीराचा बचाव करते. या मधील कुलिंग आणि क्लिंजिंग गुणधर्म त्वचेला स्वच्छ ठेवतात. या साठी काकडीचे दररोज सेवन करावे,काकडीचा रस प्यावा. संसर्ग असलेल्या भागावर काकडीचे काप करून ठेवावे. या मुळे घामोळ्यांपासून आराम मिळतो.