Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कोरोना आपल्या घरात येऊ नये, या साठी ही खबरदारी घ्या

कोरोना आपल्या घरात येऊ नये, या साठी ही खबरदारी घ्या
, रविवार, 2 मे 2021 (08:36 IST)
देशभरात कोरोना विषाणूंची प्रकरणे सातत्याने वाढत आहे.एक वेळ अशी होती जेव्हाही संक्रमण खूप कमी झाले होते, परंतु एकाएकी ते झपाट्याने वाढले आणि त्यामुळे कितीतरी लोक मृत्युमुखी झाले.त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा निष्काळजीपणा. आपण काही खबरदारी घेऊन हे संसर्ग होण्यापासून टाळू शकतो .
चला तर मग जाणून घेउ या कश्या प्रकारे आपण या संक्रमणापासून स्वतःला आणि आपल्या घराला कसे वाचवू शकतो. 
 
* मास्क वापरतांना ही चूक करू नका- आपण महत्वाच्या कामानिमित्त बाहेर जाण्याच्या विचार करत आहात तर घरातून बाहेर पडताना मास्क लावणे महत्त्वाचे आहेत काही लोक नावासाठी मास्क घालतात त्यांचे तोंड आणि नाक या मास्कने झाकलेले नसतात. त्या मुळे संसर्ग लागण्याचा धोका असतो. मास्क योग्य पद्धतीने घाला. आपले नाक तोंड झाकलेले असावे. कापडी मास्क वापरत असाल तर ते दररोज धुवावे .
 
* सुरक्षित अंतर राखावे - घरा बाहेर जाताना लोकांपासून किमान सहाफूट अंतर राखावे. जर का ती व्यक्ती कोरोनाने संक्रमित असेल परंतु त्याची काहीच लक्षणे दिसत नसेल तर अशा परिस्थितीत ती व्यक्ती संसर्ग पसरवू शकते. म्हणून लोकांपासून यानंतर राखा. वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नका. लोकांच्या संपर्कात येऊन आपल्याला संसर्ग होऊ शकतो. महत्वाचे काम असल्यासच घरा बाहेर पडावे.
 
* वारंवार हात धुवावे -आपण घरी असल्याससुद्धा साबण आणि पाण्याने कमीतकमी 20 सेकंद आपले हात धुणे महत्वाचे आहे, परंतु बाहेर असे करणे शक्य नाही या साठी आपण सॅनिटायझर वापरावे. हात न धुता आपल्या तोंडाला,नाकाला, डोळ्यांना स्पर्श करू नका. 
 
* खोकताना किंवा शिंकताना काळजी घ्या- खोकताना किंवा शिंकताना मास्क काढू नका. खोकल्यावर किंवा शिंकल्यावर लगेच मास्क बदला. हात स्वच्छ धुवा. मास्क घातला नसेल तर खोकताना किंवा शिंकताना तोंडावर किंवा नाकावर टिशू पेपर वापरा .नंतर हे टिशू पेपर डस्टबिन मध्ये टाका.
 
* घरात स्वच्छता ठेवा-बाहेरून आल्यावर घरातील दाराचे हॅण्डल, स्विचबोर्ड, नळ, सिंकची स्वच्छता करा. मोबाईल स्वच्छ करणे देखील विसरू नका.  
 
* बाहेरून आल्यावर आंघोळ करा- बाहेरून आल्यावर सर्वप्रथम कपडे बदला आणि अंघोळ करावी. त्या शिवाय घरातील कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू नका.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्नाची चव वाढविण्यासाठी या टिप्स अवलंबवा