बरेच लोक टाचेमध्ये वेदना असल्याची तक्रार करतात. ह्याचे प्रमुख कारण हिल्स घालणे देखील असू शकत. या व्यतिरिक्त टाचेच्या वेदने चे कारण वजन वाढणे, बऱ्याच काळ उभे राहणे, नवीन व्यायाम, किंवा शारीरिक क्रियाकलापांमुळे असू शकत. बऱ्याच वेळा टाचांची वेदना इतकी वाढते की पायाच्या खालच्या भागेत असह्य वेदना आणि जळजळ सुरु होते. जास्त काळ उभे राहणे, पाऊले कडक होणे, हलकी सूज येणे, टाचेची उंची वाढणे जाणवते. केल्शियम ची कमतरता देखील टाचांच्या वेदनेचे कारण होऊ शकत. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होते. हाडे कमकुवत होतात. टाचांच्या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी आपण काही घरगुती उपाय अवलंबवू शकता. जे आपल्याला टाचेच्या वेदनेपासून मुक्तता देतात. चला तर मग जाणून घेऊ या.
1 आल्याचा काढा -
आलं आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले आहे. आलं टाचेच्या वेदनेपासून मुक्त करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आल्याचा काढा प्यायल्यानं टाचेच्या वेदनेपासून आणि सूज येण्यापासून आराम मिळतो.
2 लवंगाचं तेल-
लवंगाच्या तेलात वेदनाशामक घटक आढळतात. लवंगाच्या तेलाने मॉलिश केल्यानं टाचांच्या वेदनेपासून आराम मिळतो. पायांमध्ये कोणत्याही प्रकारची वेदना जाणविल्यास लवंगाच्या तेलाची मॉलिश केल्यानं फायदा होतो.
3 हळदीचा वापर-
हळद ही मसाल्याच्या रूपात भाजीची चव वाढविण्यासाठी वापरतात. हळदीमध्ये अँटी इंफ्लिमेंटरी गुणधर्म असतात, जे सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हळदीचं दूध प्यायल्यानं शरीराची वेदना कमी होण्यास मुक्तता मिळते.
4 मोहरी-
मोहरी चे दाणे तेल बनविण्यासाठी आणि मसाल्यात फोडणी देण्यासाठी वापरले जाते. या मुळे टाचांच्या वेदने पासून देखील आराम मिळू शकतो. अर्धा वाटी मोहरी चे दाणे दळून घ्या. ह्या भुकटीला गरम पाण्याच्या बादलीत मिसळा. या पाण्यात पायांना 12 ते 16 मिनिटे घालून ठेवा असं केल्यानं टाचांच्या वेदने पासून आराम मिळतो.