हाताला पडलेले भाज्यांचे डाग बेकिंग सोडा किंवा लिंबाच्या रसाने जातात. हाताच्या त्वचेच्या मृत पेशी घालवण्यासाठी लिंबाचा रस व मीठ यांचे मिश्रण करून ते टूथब्रशने हाताला चोळावे व मग हात धुऊन टाकावे.
हाताची त्वचा नरम, मुलायम होण्यासाठी त्याल हँड क्रीम किंवा हँडलोशन नियमितपणे लावाले.
दिवसभर उभं राहून पाय शिणले असतील तर गरम पाण्यात थोडं मीठ घालून त्या पाण्यात पाय बुडवातवेत. थकवा जातो. गरम व गार पाण्याचे छोटे टब करून एकदा गरम व नंतर गार पाण्यात असं आलटून पाय ठेवल्यासही आराम वाटतो.
पायाला प्यूमिक स्टोन किंवा वजरीने घासून धुऊन मग कोरडे करून क्रीम लावल्यास पाय मऊ राहतात. भेगांसाठी खास क्रीम मिळतात ती लावावीत. शक्यतो पायात मोजे घालून ठेवावते. कोकमतेलाचाही वापर भेगांसाठी चांगला असतो.
पायाला वास येऊ नये म्हणून टाल्कम पावडर किंवा बेबी पावडर पायांवर शिंपडावी. आपल्या पायाच्या आकाराला योग्य व सुखदायी वाटेल अशी चप्पल किवा बूट याची निवड करावी.
पोहण्याच्या तलावावर असलेल्या बाथरूम्समध्ये अनवाणी चालण्याने बर्याच वेळा चिखल्या होतात. त्यासाठी सूक्ष्मजीविरोधी मलम लावावे. चिखल्या पूर्ण बर्या झाल्यावरही काहीदिवस मलम लावावे लागते.
चिखल्या होऊ नयेत म्हणून पाय बुटात सतत ठेवू नयेत. पाय स्वच्छ व कोरडे ठेवावेत. पायांसाठी मिळणारी पावडर त्यासाठी वापरावी.
हातापायांची त्वचा मृदू, मुलायम, तेजस्वी रहावी यासाठी ई जीवनसत्त्वयुक्त घटक आहारात असावे लागतात. रोज रात्री दोन बदाम पाण्यात भिजत घालून दुसर्या दिवशी सकाळी खावेत व आठवड्यातून चार वेळा तरी मोड आलेली कडधान्ये आहारात असावीतल एक दोन महिन्यांत फरक जाणवू लागतो. अधूनमधून हातपायांना मसाज करून घेतल्यानेही खूप फायदा होतो.