Publish Date: Wed, 11 Nov 2026 (15:06 IST)
Updated Date: Wed, 11 Nov 2026 (15:11 IST)
हिवाळ्यात थंड हवा आणि कोरड्या वातावरणामुळे केस कोरडे, रुक्ष आणि निर्जीव होणे ही एक सामान्य समस्या आहे. केमिकल्सयुक्त उत्पादने वापरण्याऐवजी घरात सहज उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनवलेले हे घरगुती आयुर्वेदिक तेल केसांना मुळापासून पोषण देऊन मऊ, चमकदार आणि मजबूत बनवते.
कोरड्या केसांसाठी 'खोबरेल आणि कोरफड' तेल
हे तेल केसांना उत्तम मॉइश्चरायझर प्रदान करते आणि कोरडेपणा दूर करते.
साहित्य
नारळ तेल: १ कप
ताजी कोरफड जेल: ३-४ चमचे
एरंडेल तेल: २ चमचे
कृती
एका कढईत खोबरेल तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून मंद आचेवर गरम करा. त्यात ताज्या कोरफडीचा गर (जेल) टाका. तेल मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे उकळू द्या, जेणेकरून कोरफडीतील पाण्याचा अंश उडून जाईल. तेल थंड झाल्यावर गाळून काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
निर्जीव केसांना चमक देण्यासाठी 'आवळा, रिठा आणि मेथी' तेल
केसांची मुळे मजबूत करून केसांना नैसर्गिक चमक आणि काळा रंग टिकवण्यासाठी हे तेल उत्तम आहे.
साहित्य
तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल: १ कप (हिवाळ्यात तिळाचे तेल उष्णता देते)
मेथी दाणे: २ चमचे
वाळलेला आवळा / आवळा पावडर: २ चमचे
कढीपत्ता: १०-१२ पाने
कृती
मेथी दाणे आणि आवळा हलकासा कुटून घ्या. लोखंडी कढईत तिळाचे तेल गरम करा. त्यात मेथी दाणे, आवळा आणि कढीपत्ता टाका. सर्व साहित्य काळे होईपर्यंत मंद आचेवर तेल उकळू द्या. तेल थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरा.
वापरण्याची योग्य पद्धत
कोमट करून लावा: तेल वापरण्यापूर्वी हलके कोमट करा.
मालिश करा: बोटांच्या साहाय्याने केसांच्या मुळांशी ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मालिश करा.
हॉट टॉवेल स्टीम: तेल लावल्यानंतर गरम पाण्यात पिळलेला टॉवेल ५-१० मिनिटे डोक्याला गुंडाळा. यामुळे तेल मुळांपर्यंत पोहोचते.
रात्रभर ठेवा: चांगल्या परिणामासाठी तेल रात्रभर ठेवा किंवा केस धुण्यापूर्वी किमान २ तास आधी लावा.
सौम्य शैम्पू: केस धुण्यासाठी सल्फेट-फ्री किंवा सौम्य शैम्पूचा वापर करा.
टीप: आठवड्यातून २ वेळा या तेलाचा वापर केल्यास हिवाळ्यातही केस मऊ, चमकदार आणि निरोगी राहतील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.