Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

BSNLने ही दीर्घकालीन योजना पुन्हा सुरू केली, दररोज 3 जीबी डेटा उपलब्ध होईल

BSNLने ही दीर्घकालीन योजना पुन्हा सुरू केली, दररोज 3 जीबी डेटा उपलब्ध होईल
, गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (14:04 IST)
भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) दीर्घ मुदतीच्या ग्राहकांसाठी आपली प्री-पेड योजना पुन्हा सुरू केली आहे. बीएसएनएलने आपली 1,999 रुपयांची योजना बाजारात आणली आहे. बीएसएनएलच्या या योजनेची वैधता 365 दिवसांची आहे.
 
या योजनेत ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळेल, तर डेटा संपल्यानंतर तुम्हाला 80 केबीपीएसची स्पीड मिळेल. या योजनेला दिवसाला 250 मिनिटे कॉलिंग मिळेल. विशेष म्हणजे या योजनेत मुंबई व दिल्ली येथे मोफत कॉलिंग केली जाईल, जी आधी नव्हती.
 
399 रुपयांची योजना असणारा प्लान देखील झाला अपडेट    
1,999 रुपयांच्या योजनेव्यतिरिक्त कंपनीनेही 399 रुपयांच्या प्लानला देखील अपडेट केले आहे. या योजनेची वैधता 80 दिवसांची असून त्यात दररोज 1 जीबी डेटा मिळेल. तसेच, दररोज 100 मेसेज करण्याची सुविधा असेल. या प्लानवर सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनिया, मनोहनसिंग यांना शपथविधीचे निमंत्रण