भारतीय तेल कंपन्यांनी आज (मंगळवार), 5 जुलै रोजीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता असतानाही 21 मे पासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत आज 5 जुलै 2022 रोजी एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोलची किंमत 84.10 रुपये आणि डिझेलची किंमत 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आज एक लिटर पेट्रोलची किंमत 111.35 रुपये.आणि डिझेलची किंमत 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत एक लिटर पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
राज्यस्तरीय करामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगवेगळ्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या आधारावर, तेल विपणन कंपन्या किमतींचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत निश्चित करतात.इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेल 6 रुपयांनी कमी केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे