Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

खुशखबर : 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के

खुशखबर : 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के
, शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (17:00 IST)
केंद्र सरकारने 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे. तर आता केवळ 50 महागड्या वस्तूंवरच 28 टक्के जीएसटी लागेल.गुवाहाटीमध्ये झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत जीएसटी संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जीएसटी काऊंसिलने शेव्हिंग क्रीम, टूथपेस्ट, शॅम्पू, चॉकलेट, मार्बल इत्यादी वस्तूंना 28 टक्के स्लॅबमधून हटवलं आहे. त्यामुळे आता केवळ 50 लग्झरी प्रॉडक्टच 28 टक्के श्रेणीत राहतील.

1 जुलै 2017 पासून लागू झालेल्या जीएसटीचे सध्या 0.25%, 3%, 5%, 12%, 18% आणि 28% अशी एकूण सहा दर आहेत. यामध्ये सर्वात जास्त वाढ 28 टक्के आहे. 28 टक्के जीएसटी वाहनं, लग्झरी वस्तूंसह जवळपास 200 वस्तूंवर लावण्यात आला आहे.

तर दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींवर जीएसटी 28 टक्के असल्याने सामान्यांमध्ये नाराजी आहे. उदाहरणार्थ सिलिंग फॅनवर 28 टक्के जीएसटी आणि एअर कूलरवर 18 टक्के जीएसटी आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुवर्णपदकासाठी अजब अट : शाकाहारी आणि निर्व्यसनी विद्यार्थी हवा