Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मारुतीने लाँच केली नवीन युगाची बलेनो फेसलिफ्ट कार,वैशिष्ट्ये, किंमत जाणून घ्या

Maruti Launches New Age Baleno Facelift Car
, बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (20:10 IST)
मारुती सुझुकी, सर्वात जास्त विकली जाणारी प्रवासी कार कंपनी, बुधवारी तिच्या लोकप्रिय हॅचबॅक बलेनोचा फेसलिफ्ट अवतार लॉन्च केला. या कारच्या फेसलिफ्ट या कारच्या फेसलिफ्ट व्हर्जनची अनेक दिवसांपासून ग्राहक वाट पाहत होते.  प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार गेल्या काही काळापासून सातत्याने टॉप 5 विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. 
 
कंपनीने सांगितले की बलेनोच्या फेसलिफ्ट आवृत्तीची किंमत 6.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. बलेनो फेसलिफ्ट सिग्मा, डेल्टा, डेल्टा एएमटी, झेटा,.झेटा एएमटी, अल्फा आणि अल्फा एएमटी या सात व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.सिग्मा हे बेस मॉडेल आहे तर अल्फा एएमटी हे टॉप व्हेरियंट आहे ज्याची एक्स-शोरूम किंमत 9.49 लाख रुपये आहे. यातील बहुतांश व्हेरियंट मध्ये कंपनीने 6 एअरबॅग दिल्या आहेत. 
 
कंपनीने बलेनो फेसलिफ्टसाठी सबस्क्रिप्शन योजना देखील सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मासिक शुल्क 13,999 रुपयांपासून सुरू होते.यामध्ये वाहन नोंदणी, देखभाल, विमा आणि रोड साईड असिस्टन्स यांचा समावेश आहे. लॉन्च झाल्यानंतर कंपनीने सांगितले की, ज्या ग्राहकांनी हे आधीच बुक केले आहे, त्यांची डिलिव्हरी आजपासून सुरू होत आहे. 
 
मारुती सुझुकीने बलेनोच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये स्टाइलिंगवर बरेच काम केले आहे. याला हनीकॉम्ब पॅटर्न असलेली नेक्सवेव्ह ग्रिल मिळते, जी पूर्वीपेक्षा रुंद आहे.आणि हेडलाइटला स्पर्श करते. यासोबतच क्लॅमशेल बोनेट, री-प्रोफाइल्ड बंपर, नवीन फॉग लाईट हाऊसिंग आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. 
 
यासोबतच क्लॅमशेल बोनेट, री-प्रोफाइल्ड बंपर, नवीन फॉग लाईट हाऊसिंग आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. यासोबतच क्लॅमशेल बोनेट, री-प्रोफाइल्ड बंपर, नवीन फॉग लाईट हाऊसिंग आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. 
 
कंपनीने या मॉडेलसोबत आर्क्टिक व्हाईट, स्प्लेंडिड सिल्व्हर, ग्रॅंड्यूअर ग्रे, नेक्सा ब्लू, ऑप्युलेंट रेड आणि लक्स बीज कलर पर्याय दिले आहेत .इंटिरिअरमध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत, त्यात सर्वात लक्षणीय नवीन स्टीयरिंग व्हील आहे .
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ED म्हणजे अंमलबजावणी संचालनालय नेमकं काय आहे?