एटीएममधून पैसे काढण्यासाठी एक खास अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर करुन बॅंक खात्यामधून पैसे काढू शकता. विशेष म्हणजे अशाप्रकारे अॅपचा वापर करुन पैसे काढण्यासाठी स्मार्टफोनचा कॅमेरा उपयोगी पडणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) अॅनेबल्ड अॅपचा उपयोग केला जाणार आहे. यात स्क्रीनवर येणारा क्यूआरकोड तुम्ही या अॅपमध्ये स्कॅन केल्यास तुम्हाला पैसे मिळू शकणार आहेत.
यामध्ये सुरक्षा अतिशय महत्त्वाची असून त्याबाबतच्या चाचण्या सुरु असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे. ही सुविधा प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची मंजुरी मिळणे गरजेचे आहे. एनपीसीआय ही एटीएम नेटवर्कला नियंत्रण करण्यासाठी जबाबदार असते.