तुम्ही अनेकदा इतर बँकांचे एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एटीएमवर होणारा खर्च वर फेरविचार केला जात आहे. आता इतर बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी शुल्क (इंटरचेंज फी) 20 रुपयांवरून 23 रुपये केले जाऊ शकते. याशिवाय जास्तीची रोकड काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क देखील आकारले जाऊ शकते.तसेच ज्या भागात एटीएमची कमतरता आहे त्याठिकाणी शुल्क कमी ठेवण्याचा विचार केला जात आहे. जेणे करून डीबीटीचे लाभार्थी एटीएम मधून सहज पैसे काढू शकतील.
नुकतीच एटीएम इंडस्ट्री कॉन्फेडरेशन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यात बैठक झाली. या विषयांवर चर्चा झाली. नवीन सरकार आल्यानंतर या शुल्कांमध्ये बदल होऊ शकतात.
जेव्हा तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएम किंवा व्हाईट लेबल एटीएममध्ये जाता आणि तुमच्या कार्डने व्यवहार करता तेव्हा इंटरचेंज फी आकारली जाते. ही फी तुमच्या बँकेतून गोळा केली जाते. यापूर्वी हे शुल्क प्रति व्यवहार 15 रुपये होते, ते1 ऑगस्ट 2021 रोजी वाढवून 17 रुपये करण्यात आले. गैर-आर्थिक व्यवहारांवरील शुल्क 5 रुपयांवरून 6 रुपये झाले. पण 2012 मध्ये एटीएम इंटरचेंज फी 18 रुपये होती, ती 15 रुपये करण्यात आली.
वास्तविक, रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज शुल्क प्रणालीचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. बँकांची संख्या कमी असलेल्या भागात लवकर एटीएम बसवता यावेत यासाठी ते तयार करण्यात आले.या समितीला अहवाल सादर होऊन बराच काळ लोटला आहे. भाडे, इंधन खर्च, रोख भरपाई शुल्क आणि गृह मंत्रालयाच्या सुरक्षा अटींचे पालन यामुळे खर्च वाढल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे