Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

डास तुम्हाला जास्त चावतात का ? जाणून घ्या कारण आणि प्रतिबंधात्मक उपाय

डास तुम्हाला जास्त चावतात का ? जाणून घ्या कारण आणि प्रतिबंधात्मक उपाय
, शनिवार, 4 मे 2024 (06:02 IST)
तुम्ही एकाच खोलीत बसला आहात, इतर कोणाला काहीच त्रास होत नाहीये मात्र तुम्हाला सतत डास चावत असल्याची जाणीव होत आहेत. डास तुमच्या आजूबाजूच्या कोणालाही स्पर्श करत नाहीत पण तुम्ही सतत इकहे-तिकडे खाजवत आहात... तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेक लोक तक्रार करतात की त्यांना डास खूप चावतात. शेवटी जाणून घ्या काय आहे या मागचे कारण..
 
कपडे- फिकट कपड्यांपेक्षा डास गडद रंगाच्या कपड्यांकडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळे पावसाळ्यात पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच हलक्या रंगाचे कपडे परिधान केल्याने डासांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.
 
रक्त गट- विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना डास इतरांपेक्षा जास्त चावतात. “O” रक्तगट असलेल्या माणसांना इतर रक्तगटांपेक्षा जास्त डास आकर्षित होतात.
 
शरीराची उष्णता- मादी डासांमध्ये असलेले अँटेना उष्णतेसाठी संवेदनशील असतात. ते दुरून 1 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानातील चढउतार ओळखू शकतात. ज्या लोकांच्या शरीरात जास्त उष्णता असते. यामुळे डास आकर्षित होण्याची शक्यता जास्त असते.
 
कार्बन डायऑक्साइड- मॉस्किटो अँटेना हवेतील कार्बन डायऑक्साइडच्या पातळीला देखील संवेदनशील असतात. त्यामुळे ज्यांचे चयापचय जास्त आहे आणि त्यांच्या श्वासोच्छवासाच्या हवेत जास्त कार्बन डाय ऑक्साईड तयार करतात ते अधिक डासांना आकर्षित करतात. जलद श्वासोच्छ्वास, उच्च चयापचय आणि जास्त घाम येणे हे सर्व जोडलेले आहेत आणि ते सर्व मादी डासांना आकर्षित करतात.
 
शरीराचा घाम आणि सूक्ष्मजीव- प्रत्येक माणसामध्ये काही जीवाणू असतात, जे त्यांना आजारी न बनवता त्यांच्या शरीरात एकत्र राहतात. या जीवाणूंना कॉमन्सल म्हणतात. याव्यतिरिक्त प्रत्येक मनुष्याच्या त्वचेवर घाम येतो, ज्यामध्ये एक विचित्र वास आणि विचित्र वैशिष्ट्ये आहेत. विशिष्ट भागात मुबलक प्रमाणात तयार होणारे काही वास आणि रसायने मादी डासांना आकर्षित करतात.
 
गर्भधारणा- गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. गर्भधारणेच्या संप्रेरकांमुळे शरीरात चयापचय आणि अधिक उष्णता निर्माण होते. शरीराचे तापमान वाढल्याने मादी डासांचे आकर्षण वाढते. गरोदरपणात जड श्वास घेतल्याने फुफ्फुसातून जास्त कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो आणि मादी डासांना आकर्षित करते.
 
दारू- दारूच्या सेवनाने शरीरातील उष्णता वाढते, शरीरातील चयापचय क्रिया वाढते आणि घाम वाढतो. हे सर्व घटक मादी डासांबद्दल आकर्षण वाढवण्यास मदत करतात.
 
संरक्षण कसे करावे
डासांच्या चावण्याच्या सवयी समजून घेण्यासोबतच मॉस्किटो रिपेलेंट्सचा दररोज वापर केल्यास डास चावण्याच्या घटना बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. घाण पाण्यात डीडीटी फवारणी व साफसफाई करावी. अंग पूर्णपणे झाकले जाईल असे कपडे घालावे. मॉस्किटो रिपेलेंट्स विविध प्रकारात येतात जसे फवारण्या, क्रीम, नैसर्गिक द्रावण, स्टिकर्स इ. काही उपयुक्त ठरतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Work from home हा नवीनच रोग