Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

59 एसटी डेपोंमध्ये कामकाज बंद

Operation closed in 59 ST depots
, गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (14:43 IST)
एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. ऐन सणासुदी या संपामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान आज  हायकोर्टाच्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली. यामुळं उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या असल्या तरी आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे.
 
तूर्तास एस.टी. कर्मचाऱ्यांनी संपावर न जाण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आज राज्यातील 250 डेपोंपैकी 59 डेपोंचं कामकाज बंद असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अयोध्येत एकाच वेळी सर्वाधिक ९,४१,५५१ दिवे प्रज्वलित करण्याचा गिनीज रेकॉर्ड