Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऊर्जित पटेल राजीनामा देणार नाहीत

rss economic
, गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (10:45 IST)
मोदी सरकार आणि रिझर्व्ह बँक याच्यात वाढत चाललेल्या वादामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल निराश मन:स्थितीत असून, आपल्या पदाचा ते कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याची शक्यता बुधवारी वर्तवली गेली. मात्र, काहीतरी तडजोड निश्चितपणे झाली असून, तूर्त तरी पटेल राजीनामा देणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
 
पटेल यांच्या राजीनामा देण्याच्या शक्यतेविषयी अर्थमंत्रालय व रिझर्व्ह बँकेने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत स्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न दोन्हींकडून सुरू झाले. काही कॉर्पोरेट कंपन्यांनीही मध्यस्थी केल्याचे समजते. मात्र, राजीनाम्याची शक्यता नसल्याच्या वृत्तामुळे सेन्सेक्स अचानक ५५0 अंकांनी वाढल्याचे दुपारनंतर दिसले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्या लोकांकडे नोकियाचा हा मॉडेल आहे त्यांसाठी एक चांगली बातमी...