Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नववर्षानिमित्त SBI ची ग्राहकांना भेट! व्याजदरात बंपर वाढ, नवीनतम दर येथे पहा

नववर्षानिमित्त SBI ची ग्राहकांना भेट! व्याजदरात बंपर वाढ, नवीनतम दर येथे पहा
, बुधवार, 27 डिसेंबर 2023 (12:44 IST)
स्टेट बँक ऑफ इंडिया एफडी दर: स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार नवीन दर आज 27 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत.
 
SBI बँकेने एक वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी, 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्ष ते 10 वर्षे वगळता सर्व कालावधीवरील व्याजदर वाढवले ​​आहेत.
 
एसबीआयने 7 ते 45 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता या ठेवींवर तुम्हाला 3.50 टक्के व्याजदर मिळेल.
एफडीवरील व्याजदरात 46 दिवसांवरून 179 दिवसांपर्यंत 0.25% वाढ
46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या FD वरील व्याजदरात बँकेकडून 0.25 टक्के वाढ करण्यात आली असून या कालावधीच्या FD वर 4.75 टक्के व्याज मिळणार आहे.
याशिवाय SBI ने 180 दिवसांपासून 210 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. आतापासून या FD वर 5.75 टक्के दराने व्याज मिळेल.
 
बँकेने 211 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या कालावधीवरील व्याजदरात 0.25 टक्के वाढ केली आहे. या मुदतीच्या FD वर 6 टक्के व्याज असेल. तसेच, 3 ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या FD वर आता 6.75 टक्के दराने व्याज मिळेल. त्यात 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.
 
SBI ने आज, 27 डिसेंबरपासून एफडीचे दर वाढले आहेत. येथे नवीन एफडी दर तपासा;
–7 ते 45 दिवस FD वर : 3.50%
–46 ते 179 दिवस FD वर : 4.75
–180 ते 210 दिवस FD वर : 5.75%
–211 ते एक वर्ष कालावधी एफडी वर: 6%
–एक ते 2 वर्ष कालावधी FD वर व्याज दर : 6.80%
–2 वर्ष ते 3 वर्षाहून कमी एफडी वर: 7.00%
–3 वर्ष ते 5 वर्षाहून कमी कालावधी असणार्‍या एफडीवर : 6.75%
–5 ते 10 वर्षाच्या कालावधी  असणार्‍या एफडीवर : 6.50%
 
ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI FD दर
या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 50 बेसिस पॉइंट्स (bps) मिळतील. ताज्या वाढीनंतर SBI सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 4 ते 7.5 टक्के दर ऑफर करते. 
 
यासह डिसेंबर 2023 मध्ये मुदत ठेवींवर व्याजदर वाढवणारी SBI ही पाचवी बँक ठरली आहे. बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक आणि डीसीबी बँकेनेही या महिन्यात त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Donkey Flight फ्रान्सहून 276 प्रवाशांसह 'डंकी उड्डाण' मुंबईत परतली