Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी

Webdunia
बुधवार, 19 जानेवारी 2022 (20:07 IST)
बॅालिवूड, मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनांची रांग लागलेली असतानाच आता लवकरच आणखी एक जबरदस्त मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘विशू’ असे या चित्रपटाचे नाव असून गश्मीर महाजनी विशूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे.  चित्रपटातील नायक ‘विशू’ निसर्गरम्य अशा कोकणातील समुद्रात, निरभ्र आकाशाखाली, बोटीवर मंद लाटांच्या हेलकाव्यात पहुडलेला दिसत आहे. त्याच्या मनात नक्की कोणते वादळ सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र १ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. एक अनोखी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटात गश्मीरसोबत मृण्मयी गोडबोल, ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. 
 
चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ‘’या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मी खूपच उत्सुक आहे. गश्मीर, मृण्मयी बरोबरच विशूमधील सगळ्याच कलाकारांसोबत काम करताना खूप मजा आली. मुळात हे सगळेच कसलेले कलाकार आहेत. दोन परस्परविरोधी स्वभाव जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होते, हे एका गोड प्रेमकहाणीमधून दाखवण्याचा प्रयत्न ‘विशू’मधून करण्यात आला आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’

श्री कृपा प्रॅाडक्शनचा ‘विशू’ हा प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट असून येत्या काळात श्री कृपा प्रॅाडक्शनचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘विशू’ची कथा मयूर मधुकर शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. या चित्रपटाला ऋषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले असून गाण्यांचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. तर छायाचित्रणाची धुरा मोहित जाधव यांनी सांभाळली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री प्रीती झांगियानीच्या पतीचा रस्ता अपघात, आयसीयूमध्ये दाखल

Navratrotsav 2024 : वज्रेश्वरी देवी माहिती आणि इतिहास जाणून घ्या

Shardiya Navratri 2024: प्रसिद्ध दुर्गा मंदिरे, या शारदीय नवरात्रीला भेट द्या

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

सफर निसर्गरम्य बूंदीची

पुढील लेख
Show comments