Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिद्धार्थ जाधव बनवणार तांबडा पांढरा रस्सा

Red and white gravy to be made by Siddharth Jadhav सिद्धार्थ जाधव बनवणार तांबडा पांढरा रस्सा Marathi Cinema News  IN Webdunia Marathi
, बुधवार, 19 जानेवारी 2022 (12:33 IST)
अष्टपैलू कलाकार सिद्धार्थ जाधव ने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता सिद्धार्थ म्हणजेच आपला सर्वांचा लाडका सिद्धू आता तांबडा पांढरा रस्सा तयार करणार आहे.  

सध्या झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या कार्यक्रम किचन कल्लाकार या कार्यक्रमात सिद्धू ला तांबडा पांढरा रस्सा बनविण्याचे आव्हान मिळालं आहे. किचन कल्लाकार  या कार्यक्रमात मोठे कलाकार येऊन आपल्या पाककलेचे प्रदर्शन करतात. आणि महाराजांना खुश करून स्पर्धा जिंकतात.

या मध्ये आता सिद्धार्थ जाधव यांची हजेरी लागणार असून त्यात त्यांना तांबडा पांढरा रस्सा बनवायला सांगितले जाते या वर  त्यांनी मी 'आता काय करू काय नको करू' अशी प्रतिक्रिया दिली. सिद्धार्थला किचन कल्लाकार मध्ये दिलेल्या आव्हाहनाला पूर्ण करायचे जमणार का ? त्याने बनवलेला तांबडा पांढरा रस्सा हा महाराजांना आवडणार का ? हे पाहायला मिळेल येत्या भागात. 

या भागात सिद्धार्थ सह सुयश टिळक, सायली संजीव, मृण्मयी देशपांडे, कार्तिकी गायकवाड, आणि भाऊ कदम हे कलाकार किचन मध्ये कल्ला करायला येणार आहे. 

संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करत होता. आता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया बुगडे करणार असून हा कार्यक्रम बुधवार आणि गुरुवार रात्री 9:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभिनेता वरुण धवनचा ड्रायव्हर मनोज साहू यांनी घेतला अखेरचा श्वास, अभिनेता भावुक झाले