Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सक्षम कुलकर्णीच्या 'पप्या राणे'चा डिजिटल विश्वात धुमाकूळ!

papya ranecha song
सक्षम कुलकर्णीचा 'पप्या राणे' झाला हिट!
 
आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सक्षम कुलकर्णी आता एका नव्या भूमिकेमुळे सध्या चर्चेत आहे. सक्षमने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांनाच आपलेसे केले आहे. 'दे धक्का', 'पक पक पकाक', 'शिक्षणाच्या आयचा घो' इ. चित्रपटांतून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या कॅफेमराठीच्या 'एव्हरी मराठी हाऊस पार्टी एवर' मध्ये त्याने साकारलेला पप्या राणे मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे.
 
नुकत्याच त्याने कॅफेमराठीच्या “पॅडेड की पुशप” या वेब सिरीज मध्ये देखील सक्षम कुलकर्णी अफलातून भूमिकेत होता. सक्षमने कॅफेमराठी सोबत अशा प्रकारचा कॉमेडी व्हिडीओ पहिल्यांदाच केला आहे. त्याने साकारलेला पप्या पहिल्याच व्हिडीओ मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मराठी मुलांच्या घरातील पार्टी कशी असते हे विनोदी अंगाने दाखवण्यात आले आहे. त्याची बोलण्याची शैली, हावभाव सर्वच काही एकदम भन्नाट झालं आहे. सक्षमचे आई वडिल भल्या पहाटे दोन दिवसांसाठी गावी जातात. दोन दिवस आई-वडिल घरात नसल्याने सक्षम लगेचच आपल्या मित्र आणि मैत्रिणींना फोन करून  सांगतो की माझे आईवडील दोन दिवसांसाठी बाहेर गले आहेत. तर आज रात्री माझ्या घरी पार्टीला या म्हणून सगळ्यांना बोलावतो. सगळे मित्र मैत्रिणी ठरल्याप्रमाणे पप्या म्हणजे सक्षमच्या घरी येतात.. आणि काय काय गोंधळ घालतात याचीच गंमत या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल. हा व्हिडीओ कॅफेमराठीच्या युट्युबवर आपण मोफत पाहू शकतात.या व्हिडीओचे दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कपिल शर्माच्या नवीन कार्यक्रमात रणवीर आणि साराची धूम