Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधील सर्वोच्च 5 स्पर्धकांची नावे उघड झाली!

Webdunia
शुक्रवार, 4 एप्रिल 2025 (19:19 IST)
आता गरमी खूप वाढली आहे, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ रोमांचक शेवटाकडे वाटचाल करत आहे. सर्वोच्च 5 सेलिब्रिटी स्पर्धक येथील किचनमधील वातावरण तापवण्यासाठी सज्ज आहेत. यातील प्रत्येक स्पर्धकाने ‘मास्टरशेफ’चा किताब जिंकण्यासाठी स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. हे पाच स्पर्धक आहेत- तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, फैझल शेख, गौरव खन्ना आणि राजीव अदातिया.

एका जोरदार शोडाऊन साठी सज्ज व्हा. या फिनाले आठवड्यात पाककला कौशल्य, जीवघेणी स्पर्धा आणि संस्मरणीय क्षण यांचे मिश्रण प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे!
 
निक्की तांबोळी म्हणते, “मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो, कारण हा माझा पहिलाच प्रतिभा-आधारित रियालिटी शो आहे. टॉप 5 मध्ये पोहोचणे ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण आता परीक्षक आणि शेफ यांची अपेक्षा आणखीनच वाढलेली असेल. पण टॉप 5 मध्ये आल्यानंतर माझ्यातील जिंकण्याची आग देखील जास्त चेतली आहे आणि पूर्ण योगदान देण्यासाठी मी सज्ज आहे. सध्या तर मला आकाश ठेंगणं झालं आहे. आता शेवटची काही पावले टाकायची आहेत, जी मी पूर्ण आत्मविश्वासाने टाकणार आहे.” राजीव अदातिया म्हणतो, “टॉप 5 मध्ये येण्याचा आनंद काही औरच आहे. ही एक लक्षणीय सिद्धी आहे. टॉप 5 मध्ये येणं हाच मुळात मोठा विजय आहे. मी अंतिम फेरीत पोहोचलो याबद्दल मला स्वतःचा अभिमान वाटतो.”
 
स्पर्धा आता अटीतटीची झाली आहे आणि सेलिब्रिटी मास्टरशेफ हा प्रतिष्ठित किताब हस्तगत करण्यासाठी सगळे स्पर्धक उत्कृष्ट कामगिरी करण्यास सज्ज आहेत. दृढ निर्धार, अद्भुत प्रतिभा आणि ध्यासाने वेडे झालेले हे स्पर्धक आपल्या कक्षा रुंदावण्यासाठी सरसावले आहेत आणि प्रेक्षकांचीही उत्कंठा वाढली आहे. निर्णायक लढाई आता सुरू होणार आहे. तेथे पोहोचण्याचा प्रत्येक क्षण रोमांच, आश्चर्य वाढवणारा असणार आहे. स्पर्धकांचे अविस्मरणीय परफॉर्मन्स प्रेक्षकांना बघायला मिळतील.
 
सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये नाट्य, अटीतटीची स्पर्धा आणि आश्चर्यकारक ट्विस्ट यांचा आस्वाद घेण्यास सज्ज व्हा. हा अविस्मरणीय अनुभव घ्या, सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

एफआयआरनंतर सोनू निगमने दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ केले शेअर

कंगना राणौत दिल्लीतील सरकारी निवासस्थानी स्थलांतरित

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यावर अभिनेता सुनील शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली

या घटनेमुळे संपूर्ण देश एक झाला आहे', पहलगाम हल्ल्यावर नवाजुद्दीनने व्यक्त केले दुःख

Pahalgam terror attack नंतर अभिनेता सलमान खानचा मोठा निर्णय

सर्व पहा

नवीन

Border 2: संदेशे आते है गाण्याचे नवीन व्हर्जन तयार,सोनू निगम सोबत हा गायक गाणार गाणे

अभिनेत्री मलायका अरोरा पासून श्रद्धा कपूर पर्यंत अनेक स्टार्सनी भारतीय सैन्याला सलाम केला

भारतातील हे ५ धबधबे उन्हाळ्यात तुम्हाला थंडपणाची देतील अनुभूती

प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का, कन्नड चित्रपटातून गायकाचे गाणे काढून टाकले

Joke माझी बायको मला लसूण सोलायला आणि भांडी धुवायला लावते

पुढील लेख
Show comments