Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर अज्ञाताने फेकला दगड

australian cricket team

ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर मंगळवारी रात्री  उशिरा दगडफेक झाली. सामना संपल्यानंतर एका अज्ञाताने  हॉटेलकडे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बसच्या दिशेनं एक मोठा दगड भिरकावला. ज्यात बसचं नुकसान झालं. याबाबत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंचने  ट्विट करुन माहिती दिली.

दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हॉटेलकडे जात होता. या हल्ल्याचा फोटो अॅरॉन फिंचने ट्विट केला. “हॉटेलकडे जात असताना टीम बसच्या खिडकीवर दगड मारण्यात आला. हे खूपच भीतीदायक होतं”, असं फिंचने म्हटलं आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत नागरी भागात फटाके विक्रीवर बंदी