भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज 6व्या ICC एकदिवसीय विश्वचषकात खेळणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. ICC महिला विश्वचषक 2022 च्या चौथ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरताच तिने इतिहास रचला. पाकिस्तानविरुद्धच्या या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचा जावेद मियांदाद आणि क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्या सचिन तेंडुलकरनंतर मिताली राज ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 विश्वचषक खेळणारी तिसरी खेळाडू ठरली आहे.
दोन विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणारी मिताली राज ही एकमेव कर्णधार आहे. 2017 च्या विश्वचषकापूर्वी, भारताने 2005 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता जिथे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 98 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता
2000 साली मिताली राजने न्यूझीलंडमध्ये पहिला विश्वचषक खेळला होता. त्यानंतर ती 2005, 2009, 2013 आणि 2017 मध्ये टीमचा भाग होती.