बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर वादात सापडलेल्या कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनकडून मोठी बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ए. शंकर आणि ईएस जयराम यांनी केएससीएचे सचिव आणि कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
आरसीबीच्या आयपीएल ट्रॉफी सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला.
एका संयुक्त निवेदनात, शंकर आणि जयराम यांनी सांगितले की त्यांनी गुरुवारी रात्री केएससीए अध्यक्षांना आपले राजीनामे सादर केले. "गेल्या दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनांमुळे, आम्ही कळवू इच्छितो की आम्ही कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तथापि, आमची भूमिका खूपच मर्यादित होती," असे निवेदनात म्हटले आहे.