India vs New Zealand Mumbai Tickets: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वानखेडे स्टेडियमवर 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीच्या ऑनलाइन तिकिटांची विक्री शुक्रवार, 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने मंगळवारी सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर तिकीट विक्रीची तारीख जाहीर केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील मुलांना तसेच हॅरिस आणि जाईल्स शिल्ड स्पर्धेतील उपांत्य फेरीतील खेळाडूंना कसोटी सामन्यांसाठी मोफत पास देण्यात यावेत या एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या प्रस्तावाला सर्वोच्च परिषदेने एकमताने सहमती दर्शवली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी सामना वानखेडे स्टेडियमवर तीन वर्षांतील पहिला कसोटी सामना असेल. डिसेंबर 2021 मध्ये या दोन संघांची येथे शेवटची भेट झाली होती.
सर्वसामान्यांसाठी नॉर्थ स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड आणि विजय मर्चंट स्टँडसाठी पाच दिवसांच्या पासची किंमत 1500 रुपये असेल. सुनील गावस्कर स्टँडच्या किमती रु. 325 (एक्स लोअर) आणि रु. 625 (एक्स अपर) असतील.