आस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न यांचे शुक्रवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांचे एका मुलाखती दरम्यान त्याचा माजी सहकारी मित्र शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहताना अश्रू अनावर झाले.
पॉन्टिंग म्हणाले की, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर वॉर्नच्या मृत्यूची बातमी कळतातच मला धक्का बसला. माझा चांगला मित्र आणि चांगला जोडीदार आता या जगात नाही हे मान्य करणं अशक्य आहे. वॉर्न माझ्या आयुष्याचा एक भाग होते ."
वॉर्न बद्दल पॉन्टिंग म्हणाले, मी कधीही त्यांच्यापेक्षा चांगला आणि प्रतिस्पर्धी गोलंदाज सोबत खेळले नाही.“ते खेळातील सर्व काळातील महान व्यक्तींपैकी एक म्हणून गणले जातील. त्यांनी फिरकी गोलंदाजी बदलली आणि त्यात क्रांती घडवून आणली.”
शनिवारी पॉन्टिंगने वॉर्नसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले, "शब्दात सांगणे कठीण आहे. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो जेव्हा मी 15 वर्षांचा होतो तेव्हा अकादमीत होतो. त्यांनी मला माझे टोपणनाव (पंटर) दिले. आम्ही एका दशकाहून अधिक काळ संघमित्र होतो. सर्व चढ-उतार एकत्र पहिले. ते महान व्यक्ती होते. ज्यावर आपण नेहमी विश्वास करू शकता. मी आजवर किंवा विरुद्ध खेळलेला महान गोलंदाज सह खेळले आहे."