Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी, 'आईला सरप्राईज द्यायला जात होता'

Webdunia
शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (15:45 IST)
क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडमधील रुरकी येथे झालेल्या एका कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे.
ऋषभ पंतच्या कारची डिव्हायडरला धडक बसली आहे. या अपघातात पंतची कार जळून खाक झाली आहे. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
देहरादूनस्थित मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. आशिष याज्ञिक यांनी ऋषभ पंतच्या तब्येतीविषयी सांगितलं की, "ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. ऑर्थोपेडिक सर्जन आणि प्लास्टिक सर्जनसह डॉक्टरांचं एक पथक त्याच्या दुखापतीची तपासणी करत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील उपचारांची दिशा काय असेल हे कळेल. यासंबंधीची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे दिली जाईल.”
 
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत रस्ते अपघातात जखमी झाल्याची बातमी मिळाली. त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत," अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
 
अपघात कसा झाला?
हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, "हा अपघात पहाटे 5.30-6च्या दरम्यान झाला. ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली. समोरची विंडशील्ड तुटली आणि तो बाहेर पडला. त्यानंतर कारनं पेट घेतला. प्राथमिक उपचारानंतर लाईफ सपोर्ट असलेल्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आलं आणि त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं."
 
"आम्ही डॉक्टरांशी बोललो आहोत. डॉक्टरांनी सांगितलं की, प्राथमिक तपासणीत जीवघेणं असं काहीही समोर आलेलं नाही. कोणतीही अंतर्गत दुखापत नाही. पायाला दुखापत आहे. पाठीला खरचटलं आहे. डोक्यालाही जखम आहे. बाकी एक्स- रे रिपोर्ट आल्यानंतरच कळेल.”
 
माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्विट केलं आहे. ऋषभच्या प्रकृतीला धोका नाही. त्याच्यासाठी प्रार्थना करूया. असं ते म्हणाले आहेत.
अपघातानंतर काय झालं?
सकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर अँब्युलन्स ने ऋषभला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं.
तिथे हॉस्पिटलचे चेअरम आणि ऑर्थोपेडिक सर्जन सुशील नागर यांनी उपचार केले.
 तिथे ऋषभ तीन तास असल्याची माहिती डॉक्टरांनी बीबीसीला दिली.
ते म्हणाले, “जेव्हा त्याला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याची तब्येत नाजूक होती. रुग्णालयाच्या ट्रॉमा च्या टीम ने परिस्थिती नीट हाताळली.
 
एक्सरे मध्ये त्यांना हाडाला कोणतीच जखम झाली नसल्याचं कळलं. डाव्या गुडघ्याला लिगामेंट इंज्युरी आहे.
त्याच्या डाव्या गुडघ्याला प्लास्टर लावलं आणि कार्डिअक अँम्ब्युलन्स ने मॅक्स रुग्णालयात नेण्यात आलं.
डॉक्टर नागर यांनी माहिती दिली की ऋषभ जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा मेंदूच्या आत कोणतीच जखम झाली नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
 
कुठे जात होतास असं विचारल्यावर, आईला सरप्राईज देणार होतो असं उत्तर त्याने दिलं.
अपघात कसा झाला विचारल्यावर, ‘मला हलकीशी डुलकी लागली आणि..’ असं उत्तर त्याने दिलं.
बीसीसीआय ने सुद्धा एक पत्रक काढून या अपघाताबद्दल माहिती दिली आहे.
 
“ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी जखमा आहेत. त्याच्या उजव्या गुडघ्याचं लिगामेंट फाटलं असून, उजवं मनगट, घोटा यांनाही दुखापत झाली आहे आणि पाठीला खरचटलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर सध्या देहरादून येथील मॅक्स इस्पितळात उपचार सुरू आहेत. MRI आणि इतर चाचण्यांद्वारे त्याला झालेल्या जखमांची तीव्रता कळेल.
 
बीसीसीआय सातत्याने त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आणि डॉक्टरांच्या संपर्कात आहे. या संकटातून बाहेर निघण्यासाठी बोर्डाकडून हवी ती मदत करण्यात येईल” असं बीसीसीआय चे सचिव जय शहा यांनी म्हटलं आहे.
 
कारकीर्द
भारत बांग्लादेश सीरिज नंतर पंत दुबईला गेला होता. धोनीची पत्नी साक्षी बरोबर त्याने फोटो पोस्ट केले होते.
याच आठवड्यात तो भारतात आल्याचं सांगण्यात आलं. पंत एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे.
गेल्या आठवड्यात बांग्लादेशच्या विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 93 धावा केल्या होत्या.
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी सीरिज मध्ये त्यांना भारतीय संघात जागा मिळाली नाही.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

या खेळाडूने संजू सॅमसनसारखा मोठा पराक्रम केला

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 कधी होणार जाणून घ्या

धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार!CSK सीईओ विश्वनाथयांचा खुलासा

अफगाणिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली

संजय बांगरच्या मुलाचे लिंग बदलले, आर्यनपासून अनाया बनला

पुढील लेख
Show comments