श्रीलंकेला 2 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. पहिल्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका दोन्ही संघांमध्ये खेळली जाईल आणि त्यानंतर एक टी -20 मालिका होईल.तथापि,मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आले आहे.अशा स्थितीत मालिकेवर धोक्याचे ढग दाटू लागले आहेत. श्रीलंका क्रिकेट संघाचे फिजिओ ब्रेट हॅरोप हे कोविड -19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. हॅरॉन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर यजमान संघ यापुढे एकदिवसीय मालिकेपर्यंत त्याची सेवा घेऊ शकणार नाही. या सर्व मालिका राजधानी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जातील.
अहवालांनुसार, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हॅरोप संघासोबत हॉटेलमध्ये नाहीत.त्यांनी स्वतःला क्वारंटाईन मध्ये ठेवले आहे. जर 42 वर्षीय हॅरप कोरोनामधून बरे झाले,तर ते टी -20 मालिकेनंतरच श्रीलंका संघात सामील होऊ शकतील.एका जवळच्या सूत्राने सांगितले की,'ते (ब्रेट हॅरोप) बायो-बबलमध्ये सामील झालेले नाही आणि संघासोबतही सामील नाही.त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.पण ते तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी संघासोबत राहण्यासाठी फिट असू शकतात.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही मालिका श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाची आहे कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी -20 विश्वचषकापूर्वीची ही त्यांची शेवटची मालिका आहे.दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या देशांतर्गत मालिकेसाठी श्रीलंकेने आपला 22 सदस्यीय संघही जाहीर केला आहे.अनुभवी क्रिकेटपटू दिनेश चंडिमलची या मालिकेसाठी संघातवापसी झाली आहे.2 सप्टेंबरपासून मालिका सुरू होणार आहे.चंडिमल व्यतिरिक्त कुसल परेरा आणि बिनुरा फर्नांडो हे 22 जणांच्या संघात परतले आहेत.दुखापती मुळे परेरा भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळू शकले नव्हते..