suvichar

आयसीसीच्या जागतिक गुणांकनात विराट टॉपवर

Webdunia
सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (09:09 IST)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीत आयसीसीच्या जागतिक गुणांकनात टॉपवर पोहचला आहे. असा पराक्रम करणारा कोहली सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एखाद्या हिंदुस्थानी फलंदाजाने जागतिक गुणांकनात नंबर वन स्थान पटकावले आहे.
 
विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला मागे टाकत टॉप स्थानावर मजल मारली आहे. कोहली ९३४ गुणांसह पहिल्या तर स्मिथ ९२९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणामुळे स्टिव्ह स्मिथवर आयसीसीने एक वर्षाची बंदी लादली आहे. डिसेंबर २०१५पासून स्मिथ फलंदाजी गुणांकनात टॉपवर होता.यापूर्वी जानेवारी २०११ मध्ये मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आयसीसी फलंदाजी गुणांकनात टॉपच्या स्थानावर होता. आतापर्यंत असा पराक्रम हिंदुस्थानच्या सात फलंदाजांनी केला आहे. त्यात विराट आणि सचिनव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग,गौतम गंभीर ,राहुल द्रविड ,सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

IND vs AFG: अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला आयसीसीने दंड ठोठावला

India vs Ireland : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंड संघ जाहीर

4, 4, 4, 6, 6 - वैभव सूर्यवंशीने तोडला विश्वविक्रम, 11 चेंडूत अर्धशतक ठोकले

अंतिम सामन्यात भारतीय 'अ' संघाने श्रीलंकेला ६६ धावांनी पराभूत केले

IND W vs SA W : दक्षिण आफ्रिकेने भारताला सहा गडी राखून हरवले

पुढील लेख
Show comments