Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडगावची लढाई

Webdunia
First Anglo Maratha War वडगावची लढाई 12 -13  जानेवारी 1779 मध्ये महाराष्ट्रातील वडगाव मावळ येथे मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाली होती. हे युद्ध आधी अँग्लो-मराठा युद्ध म्हणून झाले होते.
 
मुंबई बंदरगाह 1661 पासून इंग्रेजांच्या अधिपत्याखाली होते. 18 व्या शतकाच्या दुसरा अर्ध्या भागात, मराठा साम्राज्याच्या उदयासह इंग्रजांना त्या बंदरगाह सुरक्षित करण्याची काळजी लागली. बासीन (वसई) येथून उत्तरेकडे आणि पुण्यापासून पूर्वीकडे, जे दोन्ही मराठा साम्राज्याचा भाग होते त्यांना ताब्यात घेऊन सुरक्षित व्हावं अशी गरज इंग्रेजांना वाटली. मराठ्यांनी फ्रेंच यांच्याशी बोलणी देखील सुरू केली होती, जी कुठेतरी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारताहून काढून बेदखल करण्याच्या प्रयत्नासाठी होती. ह्यामुळे इंग्रेजांना त्यांच्या प्रशासनाबद्दल आणखीन असुरक्षित वाटत होतं.
 
ह्या युद्धात रघुनाथराव, नाना फडणीसचे विरुद्ध पेशवाची गादीवर बसण्यासाठी इग्रेजांचे सहायक झाले. रघुनाथराव जे पेशवा होण्याचे दावेदार होते त्यांनी इंग्रेजांशी संधी केली ज्याच्या हिशोबानी रघुनाथराव पेशवे म्हणून बसवले जातील आणि त्या बदल्यात सालसेट आणि बस्सीन (वसई) किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देतील, असा करार करण्यात आला होता.
 
ही संधी 6 मार्च 1775 रोजी केली गेली ज्याला "सुरत ची संधी" किंवा "सुरतचे तह" देखील म्हणतात.
 
नोव्हेंबर 1778 मध्ये कॅप्टन जेम्स स्टीवर्ट आणि कर्नल एगर्टन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश सैन्याने मुंबईहून बोर घाटमार्गे पुण्याच्या दिशेने वाढणं सुरु केले. कर्नल एगर्टनने बेलापूर किल्ला ताब्यात घेतला आणि पनवेल येथे तळ स्थापन केला 22 नोव्हेंबर 1778 रोजी कॅप्टन स्टीवर्ट खंडाळ्याकडे निघाले.
 
इंग्रजांकडे 4,000 तोफखाना आणि बंदुकधारी सैन्य होते आणि त्यांच्यासोबत रघुनाथराव आणि त्यांच्या सैनिक आणि घोडदळाच्या छोट्या तुकड्या होत्या.
 
पनवेलहून कर्नल एगर्टन खोपोली पोहोचले आणि तिथे दुसरा ब्रिटिश तळ स्थापन केला. तोपर्यंत कॅप्टन जेम्स स्टीवर्ट खंडाळा गावात पोहोचले आणि त्यांनी घाटाच्या शीर्ष स्थानावर तळ स्थापित केला. कर्नल एगर्टन तिथे लवकरच पोहोचले आणि त्यांनी आपल्ंे सैन्याला दोन भागात, लेफ्टनंट कर्नल के आणि लेफ्टनंट कर्नल कॉकबर्न ह्यांच्यात विभाजित केले.
 
मुंबईहून सुरुवात करण्यापासून ह्यापर्यंत त्यांना मराठांनी काही नुकसान पोहोचवले नव्हते आणि त्याकारणे त्यांचा मनोबल खूप जड होता.
 
येथे जवळ -जवळ 10 हजार मराठांची फोज तयार होती ज्याचा नेतृत्व तुकोजीराव होळकर आणि सेनापती महादजी शिंदे हे करत होते. महादजीने इंग्रेजांच्या कूच मंद केला आणि पुरवठा पंक्ति  तोडण्यासाठी पश्चिमेकडे सैन्य पाठवले. त्यांना याची माहिती मिळताच इंग्रज तळेगाव येथे थांबले. नंतर मराठा घोडदळांनी शत्रूला सर्व बाजूंनी घेराबंद केला. त्यांनी इतर प्रकाराची रणनीतीचा उपयोग केला जसे गावे रिकामी करणे, अन्न-धान्य काढून टाकणे, शेतजमीन जाळणे आणि पाण्याचे बरा विषारी करणे.
 
इंग्रजांनी मध्यरात्री तळेगावातून माघे होण्यास सुरुवात केली, पण मराठ्यांनी त्यांच्यावर हल्ला करून 12 जानेवारी 1779 रोजी ब्रिटीश सैन्याला घेरले होते, ज्याच्या फळस्वरूपात त्यांना वडगावात थांबावं लागलं. पुढच्या दिवस संपण्याधी इंग्रेज आत्मसमर्पणावर चर्चा करण्यास तयार होते.
 
16 जानेवारी, इंग्रेज आणि मराठांमध्ये 'वडगावची संधी' झाली, ज्याच्यानुसार 1773 पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे ऑफिसने ताब्यात घेतलेला सर्व मुलूख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.
 
बंगालमधून पुण्याकडे कूच करणाऱ्या ब्रिटीश सैन्याला थांबवणे आणि भरुच जिल्ह्याच्या महसुलाचा वाटा करणे ह्याचे देखील करार यात होते.
 
इतिहासकार डॉ कर्नल (निवृत्त) अनिल आठले यांच्या मतानुसार, वडगाव मावळची विजयच्या मराठा अभिमानात विशेष स्थान आहे. ते म्हणतात, "भारतात इंग्रजांना चार वेळा जोरदार प्रतिकार झाला आणि वडगाव मावळची घटना ही एकमेव वेळ होती जेव्हा त्यांना आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी करावी लागली आणि परतावं लागला."
 
2003 मध्ये 'एक्स्प्रेस नागरीक वडगाव विजयस्तंभ प्रतिष्ठान' नावाच्या विजयस्तंभ वडगावच्या लढाईच्या स्मरणार्थ बनवण्यात आला. हा विजय आजही येथे दरवर्षी साजर करण्यात येतो.
 
- हर्षिता बारगल

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Video गर्भवती महिलेला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागली

1956 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगी हिस्सा मागू शकत नाही, मालमत्ता वादात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

उद्धव ठाकरे, फडणवीसांनंतर आता अजित पवारांची बॅग तपासली

IND vs SA : अर्शदीप ठरला T20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi आज PM मोदी छत्रपती संभाजी नगर, पनवेल आणि मुंबईत जाहीर सभा घेणार

पुढील लेख
Show comments