Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोहर जोशी यांची पूर्ण माहिती जाणून घेऊ

Webdunia
बुधवार, 24 मे 2023 (11:45 IST)
मुंबई महापालिकेत नगरसेवक ते महापौर…… पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री... जाणून घेऊ पूर्ण माहिती  मनोहर जोशी यांची.. 
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी झाला.
शिवसेनेच्या इतिहासात बाळासाहेबांप्रमाणेच मनोहर जोशी यांचे स्वतंत्र स्थान आहे. शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. १९६७ एप्रिलमध्ये मनोहर जोशी यांनी पक्षसंघटनेत प्रवेश केला. तेंव्हापासून आजपर्यंत ५० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेतील चढऊतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे.

राजकारणाप्रमाणेच व्यवसायातही यश मिळवून त्यांनी कोहिनूरची उंची गाठली. जोशी यांचे शिक्षण मुंबईत झाले. ते बॅचलर ऑफ लॉ आहेत आणि त्यांनी कला, पदव्युत्तर पदवी घेतली असून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या विषयात ते पारंगत आहेत. १९६८ मध्ये मनोहर जोशी सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरलेच, पण राज्याचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्रीही ठरले.
 
अडचणी , गरीबीवर मात करणारा नेता बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता  .. मनोहर जोशी पूर्ण माहिती
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  हे हिंदुजा रुग्णालयात येऊन गेले. सध्या मनोहर जोशी यांचं वय 86 वर्षे इतकं आहे. मनोहर जोशींचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. एक नजर टाकूया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कारकिर्दीवर...
मनोहर जोशी १० मे २००२ रोजी लोकसभा सभापतीपदी बिनविरोध निवडले गेले ते ४ जून २००४ पर्यंत या पदावर राहिले.

शिवसेना काल-आज-उद्या- हे श्री.मनोहर जोशी यांनी लिहिलेले पुस्तक हे शिवसेना या अफ़ाट संघटनेचे चरित्रलेखन आहे. तसेच मनोहर जोशी यांनी धंदा कसा करावा या हे पुस्तक आपल्या अनुभवावर लिहिले आहे. अशोक चिटणीस यांनी मनोहर जोशी यांच्या जीवनावर महाराष्ट्र कोहिनूर या नावाने चरित्रात्मक आत्मचरित्र लिहिले आहे.

कसा आहे मनोहर जोशींचा प्रवास…
मनोहर जोशी यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबईचे महापौरपदही त्यांनी 1976 ते 1977 या काळात भूषवलं होतं. तर शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले होते. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Former CM) , खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले होते.
 
महानगरपालिकेत अधिकारी म्हणून नोकरी
मनोहर जोशी हे मूळचे बीडचे असून त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावात झाला. शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईत स्थलांतरीत झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणूनही नोकरी केली. दरम्यान, शिंदेंच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींची भेट घेतली होती. यावेळी जोशी हे शिंदेंसोबत जाणार का, अशी चर्चा सुरु होती.
 
दसरा मेळाव्यातून तात्काळ निघावे लागले
दरम्यान, मनोहर जोशी हे बाळासाहेबांच्या खूप जवळचे मानले जात होते. बाळासाहेबांच्या ह्यातीत जोशींना खूप मानसन्मान तसेच मोठमोठी पदं मिळाली. महापौर ते मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेत मनोहर जोशींनी भूषविले. मात्र बाळासाहेबांच्या नंतर त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. दसरा मेळाव्यात शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करताच, त्यांना मंच सोडून निघावे लागले होते.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments