Dharma Sangrah
✕

World Milk Day 2026 : जागतिक दूध दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या

वेबदुनिया न्यूज टीम
सोमवार, 1 जून 2026 (10:16 IST)
World Milk Day 2026 : दुधाचे सेवन शरीरासाठी बरेच फायद्याचं ठरतं. दुधामधून अनेक आवश्यक पौष्टिक पदार्थ मिळतात. दुधाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि ते व्यर्थ जाऊ देऊ नये म्हणून दरवर्षी 1 जून हा जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. 
ALSO READ: जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
जागतिक दूध दिवस हा जागतिक अन्न म्हणून दुधाचे महत्त्व ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) स्थापन केलेला आंतरराष्ट्रीय दिवस आहे. दरवर्षी 1 जून रोजी हा दिवस साजरा केला जातोआजही भारतात असे बरेच लोक आहेत ज्यांना दूध मिळत नाही, यामुळे त्यांच्या शरीरात पोषणाचा अभाव आहे. चला तर मग जाणून घेऊया जागतिक दूध दिनाचे महत्त्व.
ALSO READ: World Hunger Day 2025:जागतिक उपासमार दिन का साजरा करतात, इतिहास, महत्त्व जाणून घ्या
जागतिक दूध दिनाचा इतिहासः
हा दिवस 2001 या वर्षी साजरा करण्यास सुरुवात झाली. याची सुरुवात संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या मंत्रालयाने सुरू केली. जागतिक दूध दिन यात गेल्या काही वर्षात 70 पेक्षा जास्त देश सहभागी होत आहे. या देशांमध्ये दुधाचे महत्त्व समजण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. 26 नोव्हेंबर रोजी भारतात राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो.
 
दुधात आढळतात हे पोषक घटक:
दुधात पुष्कळ पोषक द्रव्ये आढळतात जी शरीरासाठीही खूप महत्वाची असतात. दुधात व्हिटॅमिन-ई, डी, के आणि ए आढळतात. शिवाय, मॅग्नेशियम, आयोडीन, फॉस्फरस, कॅल्शियम, राइबोफ्लेविन देखील दुधात आढळतात, म्हणून लहानपणापासूनच दुधाचे सेवन मुलांसाठी खूप फायदेशीर आहे आणि वृद्धांच्या आरोग्यासाठी देखील हे आवश्यक आहे.
ALSO READ: International Tea Day 2025 २१ मे रोजीच का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चहा दिन? महत्त्व आणि फायदे जाणून घ्या
का साजरा करतात हा दिवस
हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरात दुधाला जागतिक आहार म्हणून मान्यता देणे. लोकांना वाटते की दुध फक्त मुलांच्या आरोग्यासाठीच आवश्यक असते आणि मोठ्यांना याची फारशी गरज नसते पण तसे नाही. दूध प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. लोकांना आहारात दुधाचा समावेश करणे महत्वाचे आहे हे पटवून देण्याचेही प्रयत्न केले जातात कारण हे पिण्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. यासह हा दिवस साजरा करण्याचा हेतू डेयरी किंवा दुधाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात स्थिरता, उपजीविका आणि आर्थिक विकासास प्रोत्साहन देणे आहे.
 
Edited by - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? संजय राऊत म्हणाले, शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत

पुण्यात FDA ची मोठी कारवाई; ९३ किलो संशयास्पद मिठाई जप्त, दोन दुकानांचे परवाने निलंबित

नेपाळ मध्ये व्हॅन दरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला! सुप्रिया सुळे यांनी चर्चांना दिला पूर्णविराम

पुढील लेख
Show comments