राज्यात गृह खात्या कडून जाहीर करण्यात आलेल्या पोलीस भरती संदर्भात नवीन Police Bharti 2022 Gr जारी करण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज अधिकृत संकेत स्थळावर
policerecruitment2022.mahait.org दिनांक 3 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पाठवावे.
पदांचा तपशील -
एकूण पदे 17130
अर्ज सुरु होण्याची तारीख - 3 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2022
नियम आणि अटी -
* उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल.
* उमेदवाराला एकापेक्षा अधिक आवेदन अर्ज देता येणार नाही.
* चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारता येईल .
पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल.
* त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
* भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1.10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
* उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरतील.
* शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्ताकेली जाईल.
* तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील.
* कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती असेल. ·
शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.10.12.2020 नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यांत येईल.
उमेदवाराने अर्जाच्या बाबत सर्व माहिती अधिकृत संकेत स्थळावर काळजीपूर्वक जाणून घ्यावी.