Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 25 May 2025
webdunia

या क्वारंटाईनमध्ये सकारात्मक तरीही सुंदर कसे राहू शकाल ?

stay positive
, सोमवार, 18 मे 2020 (12:09 IST)
कोविड -१९ साथीच्या रोगाने आपल्या सर्वांना घरी राहण्यास भाग पाडले आहे. आपली दिनचर्या ठरल्यामुळे, दिवसभर अचानक घरी राहिल्याने आपल्याला आळशी, अस्वस्थ आणि निराश वाटू शकते. आपण या भावनांना कसे सामोरे जाता आणि आपला दिवस प्रोडक्टीव्ह कसा बनवाल याबद्दल काही टिप्स.

यावर विश्वास ठेवा किंवा नाही, चांगले आणि अधिक प्रोडक्टीव्ह वाटण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे आरामदायी कपडे वापरणे आणि त्यामध्ये पहिला येतो पायजमा. आता याचा अर्थ असा नाही की आरामदायी आणि कम्फर्टेबल वाटण्यासाठी फिट कपडे घालू नयेत, श्री. नेल्सन जाफरी, डिझाइन हेड, लिवा यांनी काही क्वारंटाईन दरम्यान असे काही कपडे सांगितले आहेत ज्यामुळे विचारांना प्रोत्साहित आणि आरामदायी ठेवण्यासाठी मदत होईल. “हलके आणि ब्रेथेबल फॅब्रिक्स उन्हाळ्यासाठी योग्य आहेत. व्हिस्कोस आणि मॉडेल चे कपडे हे उत्तम पर्याय आहेत कारण, केवळ हे फॅब्रिक्सच उत्कृष्ट ड्रेप देत नाहीत तर ते निसर्ग-आधारित आणि टिकाऊ देखील असतात.”
stay positive
शॉर्ट्स आणि शर्ट
आपल्याकडे शॉर्ट्स आणि शर्ट मोठ्या प्रमाणात असतात पण ते पण योग किंवा वर्कआउट्सच्या वेळेलाच वापरतो, तर तसे न करता त्याच्या वापर तुम्ही बाहेर किंवा गार्डन मध्ये फिरण्यासाठी हि करू शकता. शॉर्ट्स परिधान केल्याने आपल्याला केवळ उडी मारण्यास आणि मुक्तपणे फिरण्यास चालना मिळते असे नाही तर उत्तमपणे आराम हि मिळते. आपले शॉर्ट्स अधिक फॅशनेबल दिसण्यासाठी आपण टी-शर्टऐवजी ब्लॅक कलरच्या शर्टसह घालू शकता. ह्यामुळे चांगले दिसण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आणि तरी हि तुम्ही उठून सुंदर दिसाल. जर तुम्हाला अजून त्यामध्ये काही ऍडिशनल करायचे असल्यास त्यासोबत लांब ऑक्साईड झुमके वापरू शकता.

stay positive
 




 


पलाझो आणि क्रॉप टॉप
कपड्यांच्या सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक आहे आणि असणार हि का नाही? पॅलाझो पारंपारिकरित्या परिधान म्हणून केले जाते, परंतु आता तो पुन्हा टॉप ट्रेन्डमध्ये असल्याचे दिसते आहे. पलाझो स्टाईल करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यास क्रॉप टॉपसह घातल्यास अधिक आकर्षक दिसेल आणि तुमच्या बेडरूमच्या झोनला अनुकूल हि दिसेल. त्या व्यतिरिक्त, क्रॉप टॉप परिधान केल्याने तुम्हाला भूक नियंत्रित करण्यास देखील प्रेरणा मिळेल.
stay positive

स्वेटपॅन्ट सोबत टक-इन केलेले टी-शर्ट
स्वेटपॅन्ट केवळ झोपतानाच नाही तर बाहेर जाताना किंवा लाऊंजवर फिरताना ही वापरू शकता. स्वेटपॅन्ट ही स्ट्रीट स्टाईलची फॅशन बनली आहे जी प्रसिद्ध व्यक्तींनी प्रेरित केली आहे. आपण सहजपणे स्वेटपॅन्ट घालू शकता आणि ते अधिक स्टाईलिश दिसू शकते जर तुमच्या आवडत्या टी-शर्टमध्ये अचूक टक-इन केले तर.
stay positive

अंगरखा पोशाख
जर तुम्हाला घरी बसून वसंत ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर अंगरख्या सारखा दुसरा पर्यायच नाही, यामुळे खूप उत्साही आणि सकारात्मक वाटते. त्याचा अतिरिक्त बोनस म्हणजे त्यांना खिसे देखील असतात, त्यामध्ये छान कॅंडी टाकून मिरवत हि येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनुलोम विलोम म्हणजे काय ? हे घरी कसे करावे ?