Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 22 May 2025
webdunia

हिल्स न घालता देखील या टिप्स अवलंबवून साडीमध्ये सडपातळ आणि उंच दिसू शकता.

Following these tips can make a saree look slimmer and taller
, शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (19:48 IST)
साडी नेसायला सगळ्यांना आवडते परंतु बऱ्याच वेळा लोकांना असं वाटते की त्या साडी मध्ये जाड दिसतील. बऱ्याचवेळा साडी चुकीच्या पद्धतीने नेसल्यानं तर कधी चुकीच्या फॅब्रिकची निवड केल्यानं देखील साडीमध्ये जाड दिसू शकता. अशीच समस्या साडीमध्ये उंच आणि लहान दिसण्याबद्दलची आहे. बऱ्याचवेळा लोकांना असं वाटते की त्यांनी हिल्स घातल्यावरच उंच दिसू शकतात.
प्रत्यक्षात साडीमध्ये उंच आणि पातळ दिसण्यासाठी आपण काही सोप्या युक्त्या अवलंबावी शकता. चला तर आज आम्ही आपणास अशा काही सोप्या युक्त्या सांगत आहोत.ज्यांच्या साहाय्याने आपण साडीत देखील हिल्स न वापरता पातळ आणि उंच दिसू शकता.
 
 साडीची निवड -
आपला लूक कसा दिसेल हे बऱ्याचशा वेळा साडीच्या निवडीवर देखील अवलंबवून आहे.एखाद्या समारंभात जायचे असेल तर साडीची निवड अशी करा ज्यामुळे आपण साडीत जाड दिसणार नाही.
 
* हलक्या कापडाची साडी निवडा-
सूती किंवा कॉटन, आणि ऑर्गनझा चे कपडे हाताळणे अवघड असतात हे पसरतात देखील  ज्यामुळे आपण जाड दिसता. विशेषतः खालील भाग कॉटनच्या साडीमुळे फुगलेलं दिसत. आपण या ऐवजी हलके आणि हवादार फॅब्रिक निवडा. शिफॉन,सॅटिन,जॉर्जेट या फॅब्रिकच साड्या हलक्या असतात ज्या नेसायला सहज असतात आणि खालचा भाग शेप मध्ये दिसून येतो. 
 
* बारीक किंवा पातळ बॉर्डरची साडी निवडा-
बारीक बॉर्डर असलेली साडी पातळ कंबर असल्याचा भास देतात. जाड बॉर्डरची कॉटन साडी दिसायला जरी स्टायलिश असली तरी त्यांना नेसणे आणि पातळ दिसणे अवघड आहे.
 
2 नेसण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या -
साडी नेसण्याची पद्धत चुकीची असेल तर शरीर बेढब दिसू शकत यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. 
 
* नाभीच्या खाली साडी नेसा-
साडी नेसण्याची पद्धत देखील हे दर्शवते की आपल्या वर साडी कशी दिसेल आणि आपला बांधा त्यात कसा दिसेल. जर आपण साडी नाभीच्या वर नेसाल तर पोट फुगलेले दिसेल आणि टायर दिसेल जर आपले पोट खूप जास्त निघाले आहे आणि बॅक फॅट किंवा फेस फॅट जास्त असेल तरी देखील नाभीच्या खाली साडी नेसू शकता.
 
* प्लिट्स घेणं महत्त्वाचे आहे-
साडीच्या प्लिट्स चुकीच्या पद्धतीने घेतल्या असतील तर साडीमध्ये लठ्ठपणा दिसेल जर वरून आपण सेफ्टीपिन लावता तरी खालील बाजूस प्लिट्स जमण्यासाठी पिन लावा. पिन अशा पद्धतीने लावा की ती दिसणार नाही. या मुळे प्लिट्स जागेवर राहतात. बरेच लोक साडी पिन या साठी वापरतात की प्लिट्स जागेवर राहतील.
 
3 रंग आणि प्रिंट्सची निवड- 
 
रंग आणि प्रिंट्सच्या निवडवर साडीचा आणि आपला लूक अवलंबून असतो.
 
* गडद रंगाची निवड करा-
सर्व प्रकारच्या स्त्रियांसाठी गडद रंग योग्य आहेत आणि हे एक सुरक्षित पर्याय देखील आहे. फिकट रंगाचा वापर केल्यानं आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लक्ष दिले जाते आणि गडद रंग मुळे गडद रंग आणि साडीच्या डिझाइनकडे जास्त लक्ष दिले जाते.
 
* लहान चांगल्या  प्रिंटची निवड -
हेवी एम्ब्रायडरी किंवा मोठ्या प्रिंट्स च्या साडीनेसण्याच्या ऐवजी लहान बारीक प्रिंटच्या साडीची निवड करा.बुटीदार,लहान बारीक प्रिंटची साडी नेसायला चांगल्या आणि ग्रेसफुल असतात. हे नेसून भास होतो की आपले पोट आणि कंबरेचा फॅट कमी आहे. आपण जियोमेट्रिकल प्रिंट्स च्या साड्या देखील नेसू शकता.या मुळे आपण उंच आणि सडपातळ दिसाल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आतड्यामधील सूज कर्करोगाचा धोका वाढवू शकते जाणून घ्या ह्याची लक्षणे आणि उपचार