Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक 'वट सावित्री व्रत', जाणून घ्या वृक्षाशी निगडित 12 विशेष गोष्टी

2020 Vat Purnima Vrat
, मंगळवार, 2 जून 2020 (07:17 IST)
भारतीय संस्कृतीमध्ये वट सावित्री पौर्णिमा व्रत आदर्श स्त्रीत्वाचे प्रतीक बनले आहेत. वट पूजेशी निगडित धार्मिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक बाबींमध्ये वट आणि सावित्री दोघांचे महत्त्व आहेत. पौर्णिमेला साजरे केले जाणारे हे व्रत कैवल्य सौभाग्य आणि अपत्य प्राप्तीमध्ये साहाय्य करणारे आहेत. सुख भरभराटी आणि अखंड सौभाग्याचं लेणं देणाऱ्या या वट वृक्षाबद्दलची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.....
 
* पुराणात असे स्पष्ट केले आहे की वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं वास्तव्य आहे.
* वट पूजेशी निगडित धार्मिक, वैज्ञानिक आणि व्यावहारिक पैलू आहेत.
* वटवृक्ष ज्ञान आणि सृष्टीचे प्रतीक आहे.
* भगवान बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली होती. 
* वट वृक्ष हे मोठे असून पर्यावरणच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत, कारण या झाडावर अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे जीवन अवलंबून असतं. 
* हे वातावरणाला शुद्ध करून मानवाच्या गरजपूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
* तत्त्व ज्ञानाच्या दृष्टिकोनातून वट वृक्ष दीर्घायुष्य आणि अमरत्वाचे प्रतीक म्हणून स्वीकारले जाते.
* वट सावित्री व्रतामध्ये बायका वट म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करतात.
* वडाच्या झाडाच्या खाली पूजा करून कथा ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
* वडाची पूजा आणि सत्यवान सावित्रीच्या कथेचे स्मरण करून देण्यासाठी हे व्रत वट सावित्री या नावाने प्रख्यात आहे.
* धार्मिक मान्यतेनुसार वडाची पूजा दीर्घायुष्य, सुख- समृद्धी आणि अखंड सौभाग्याचे लेणं देण्यासह सर्व प्रकारचे कष्ट आणि दुःखाचा नाश करणारी आहेत.
* प्राचीन काळात मनुष्य इंधन आणि आपल्या आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी लाकडांवर अवलंबून असे. पण पावसाळा झाडे बहरण्यासाठी, वाढण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्याचसोबत अनेक प्रकारांचे विषारी प्राणी अरण्यात वावरत असतात. म्हणूनच मानव जीवनाच्या संरक्षणासाठी आणि पावसाळ्यात झाडे झुडुपं तोडण्यापासून वाचविण्यासाठी अशे व्रत कैवल्य धर्माशी जोडून दिले आहेत. जेणे करून झाडे झुडुपं बहरत राहो आणि त्यांच्यापासून आपल्या सर्व गरजा दीर्घकाळापर्यंत पूर्ण होत राहो.
 
या व्रत कैवल्याची वैज्ञानिक आणि व्यावहारिक गोष्ट बघितल्यावर या व्रत कैवल्याची सार्थकता दिसून येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वट सावित्री अमावस्या वट सावित्री पौर्णिमेहून वेगळी कशी काय