Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चित्रपट परीक्षण : ड्राय डे

चित्रपट परीक्षण : ड्राय डे
, शनिवार, 14 जुलै 2018 (12:58 IST)
चित्रपटात कॉन्सेप्ट नावाची एक गोष्ट असते. म्हणजे बीज संकल्पना. त्याभोवती चित्रपटाची रचना केली जाते. कोणाला आजच्या बलात्कारासारख्या ज्वलंत समस्येवर आधारित चित्रपट करायचा असतो तर कोणाला कोणाच्या आयुष्यावर. त्यामुळे हे वरवर सोपे आणि सरळ वाटल्याने अनेकांच्या कॉन्सेप्टबद्दलच्या कॉन्सेप्ट विलक्षण असतात. कथा आणि किस्सा यांच्यात फरक न कळल्याने चित्रपटाचा 'ज्योक' बनतो. ड्राय डेच्या दिवशी दारू पिणे हे तरुण वयात मोठे साहसी कार्य वाटू शकते. ते एकवेळ क्षम्य आहे. कारण आपण त्याकडे तरुणपणीची चूक म्हणून दुर्लक्ष करू शकतो. पण हा किस्सा म्हणून 'बसलेले' असताना दोन मिनिटात सांगण्याऐवजी त्यावर दोन तासांचा चित्रपट काढला तर तो क्षम्य एकाच कारणाने असू शकतो. तो म्हणजे चित्रपटकलेचा एकमेव नियम-कंटाळा न आणण्याचा-पाळला तरच. एक प्राध्यापक एका कॉलेजच्या आवारात दारूची फुटलेली बाटली पाहून वर्गात विचारतो की ते कोणी केले. एक सर्वज्ञानी विद्यार्थी उत्तर देतो आम्ही नाही. तो शिक्षक सगळ्यांना शिक्षा म्हणून सगळी साफसफाई करण्यास सांगतो. कॉलेजमध्ये दुसरा वर्ग नसावा. पण त्यामागे त्या प्राध्यापकाचा महान हेतू असतो. आपल्या आयुष्यातील ड्राय डेच्या दिवशी दारू पिण्याचा अनुभव सांगण्याचा. जो तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगतो. त्याचाच हा चित्रपट आहे. हा प्राध्यापक होण्याआधी काही मूर्ख आणि नालायक लोकांचा मित्र होता. त्याला अभ्यास करायला घर नसते पण खिशात भरपूर पैसे असतात. त्याचा प्रेमभंग झालेला मित्र हिरो आहे.
webdunia

त्याचा प्रेमभंग झाला ही एक गोष्ट आहे, पण तिची स्कूटर हरवली ही त्याहून अधिक महत्त्वाची घटना त्याच्या आयुष्यात घडलेली आहे. त्यामुळे त्याला घेऊन अन्य बिनकामाच्या मित्रांना उठवत, जमवत दारू पीत हिंडतात. आणि ते दारू पिऊन काय काय करतात हे पाहून लेखक दिग्दर्शकाला सांगावेसे वाटते, बाबांनो, तुमची पात्रे जेवढी पितात त्यापैकी दोन दोन पेग तरी तुम्ही प्यायला असतात तर अधिक चांगले सुचले असते. असो. मुळात ओढून ताणून आणलेल्या किस्स्याला चित्रपटासाठीची कथा मानण्याची बात आहे, तेथे अन्य गोष्टींबद्दल काही सांगायलाच नको. तंत्रज्ञानामुळे चित्रपट करणे आजकाल सोपे बनलेले आहे, मात्र त्यात कला आणि कौशल्य या तंत्रज्ञानाला दिशा देणार्‍या गोष्टी खूप हत्त्वाच्या असतात. त्यात गीतसंगीताची बाजू उजवी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा नवर्‍याला बघते दुसरी मुलगी