Publish Date: Wed, 05 Aug 2026 (10:58 IST)
Updated Date: Wed, 05 Aug 2026 (11:03 IST)
प्रसिद्ध जोडी अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा गेल्या १८ महिन्यांपासून विभक्त झाल्याची बातमी समोर आली आहे. पण, यावर दोघांनी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता खानविलकर बाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमृता खानविलकर आणि त्यांचे पती अभिनेते हिमांशू मल्होत्रा, यांच्या नात्यात सलोखा नाही. गेल्या १८ महिन्यांपासून हे दोघे वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा विभक्त झाले असले तरी, ते अजूनही नात्यात असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांनुसार, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, तसेच त्यांनी घटस्फोटासारखी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही.
गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. याचे एक कारण म्हणजे ते पूर्वीपेक्षा सोशल मीडियावर एकमेकांचे कमी फोटो शेअर करतात. तथापि, अमृता आणि हिमांशू यांनी यापूर्वीच या अफवा फेटाळून लावल्या आहे आणि स्पष्ट केले आहे की ते विवाहित आहे व त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करायचे नाही.
अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांची पहिली भेट २००४ मध्ये एका रिॲलिटी शो दरम्यान झाली. त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले आणि जवळपास एक दशक डेटिंग केल्यानंतर, त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. सध्या, त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीवर दोन्ही कलाकारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Edited By- Dhanashri Naik