Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धन प्राप्तीसाठी राशीनुसार अचूक मंत्र...

Webdunia
ज्योतिष शास्त्रात प्रत्येक जातकाची चंद्र राशी असते आणि प्रत्येक चंद्र राशीचा स्वामी ग्रह असतो. या प्रकारे प्रत्येक ग्रहाचा एक इष्ट देव असतो. जर कुठल्याही स्वामी ग्रहाच्या इष्ट देवताला प्रसन्न केले तर जातकाच्या जीवनात येणार्‍या अडचणींपासून नक्कीच सुटकारा मिळतो.  
 
मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीचे जातकांच्या जीवनात येत असलेल्या सर्व अडचणींना दूर करायचे असेल तर हनुमानाची आराधना केली पाहिजे.  
 
मंत्र- ॐ हनुमते नमः चा जप रोज केल्याने, आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात लाभ मिळतो.  
 
वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र मानला जातो. या राशीच्या जातकांना धन संबंधी सर्व प्रकारच्या समस्यांचा अंत करण्यासाठी दुर्गांची पूजा केली पाहिजे.  
मंत्र- ॐ दुर्गादेव्यै नम:च्या जपामुळे सर्व वित्तीय समस्यांचा अंत होतो.  
 
मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे, या राशीच्या जातकांना गणपतीची पूजा करायला पाहिजे, ज्याने त्यांना प्रसिद्धी प्राप्त होते.  
मंत्र- ॐ गं गणपते नमः चा जप केल्याने नोकरी आणि व्यवसायात येत असलेल्या सर्व बाधा दूर होण्यास मदत मिळते.
 
कर्क राशिच्या जातकांमध्ये चंद्र ग्रह, राशीचा स्वामी असतो. ज्योतिषीनुसार चंद्रावर महादेवाचा राज असतो. या राशीच्या जातकांना धन संबंधित लाभ प्राप्त करायचा असेल तर महादेवाची पूजा करायला पाहिजे.  
मंत्र- ॐ नमः शिवाय मंचा रोज  जप केल्याने त्याचे उत्तम परिणाम नक्कीच मिळतात.  

- श्रीरामानुज
सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. सिंह राशीच्या जातकांना सूर्याची पूजा केल्याने आणि रोज अर्घ्य चढवल्याने ऊर्जा प्राप्त होते.  
मंत्र- ॐ सुर्यायें नमः चा जप केल्याने फायदा मिळतो.  
 
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. या राशीच्या जातकांना गणपतीची पूजा केली पाहिजे त्याने लवकरच त्यांच्या धनासंबंधी समस्यांपासून त्यांना सुटकारा मिळतो.  
मंत्र- ॐ गं गणपते नमः मंत्राचा जप रोज सकाळ संध्याकाळ केल्याने लाभ मिळतो.  
 
तुला राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. तुला राशीच्या लोकांनी देवीची पूजा केल्याने त्यांना फायदा होतो. तुला राशीचे जातकांनी जर लक्ष्मीला प्रसन्न केले तर धन संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते.  
मंत्र- ॐ महा लक्ष्म्यै नमः मंत्राचा जप केल्याने लक्ष्मी प्राप्त होण्यास मदत मिळते.  
 
वृश्चिक राशीचा ग्रह मंगळ आहे. वृश्चिक राशी असणार्‍या लोकांनी मारुतीची पूजा करणे शुभ मानले जाते.  
मंत्र- ॐ हं हनुमते नमः मंत्राचा जप केल्यानं शारीरिक पीडा आणि धन संबंधीत सर्व कष्ट दूर होण्यास मदत मिळते. 
धनू राशी गुरू ग्रहाशी निगडित असते. धनू राशीच्या जातकांसाठी विष्णूची पूजा करणे शुभ मानले जाते.  
मंत्र- ॐ श्री विष्णवे नमः मंत्राचा रोज जप केल्याने व्यवसायात लाभ मिळतो.  
 
मकर राशीचा स्वामी शनी आहे म्हणून शनी किंवा मारुतीची पूजा, या राशीच्या लोकांसाठी शुभ असते.  
मंत्र-  ॐ शम् शनिश्चराये नम: मंत्राचा जप केल्याने सर्व बाधा दूर होण्यास मदत मिळते आणि घरात सुख शांती येते.  
 
कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनीचे गुरु देव महादेव असल्याने या राशीच्या लोकांनी शनी सोबत महादेवाची पूजा केली पाहिजे. 
मंत्र- ॐ महामृत्युंजय नमः मंत्राचा जप रोज सकाळी व संध्याकाळी 108 वेळा करायला पाहिजे ज्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होण्यास मदत मिळते.  
 
मीन राशीचा स्वामी गुरु सांगण्यात आला आहे. या राशीच्या जातकांना नारायणाचे ध्यान आणि मंत्र जप केल्याने धन संबंधित सर्व समस्यांचे समाधान होण्यास मदत मिळते.  
मंत्र- ॐ नारायणा नमः एवं ॐ गुरुवे नमः मंचा जप शुभ फल प्रदान करतो.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Saubhagya Panchami 2024 : आज मनापासून शिव - शंभूची पूजा करा, सर्व इच्छा पूर्ण होतील.

Chhath Pooja 2024 : छठ पूजा म्हणजे काय? चार दिवसांच्या सणाबद्दल संपूर्ण माहिती

संकष्टनाशनविष्णुस्तोत्रम्

आरती बुधवारची

वराहस्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments