आजकाल भाजी मार्केटमध्ये वर्षभर सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात. असे कसे शक्य आहे, याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात अनेकवेळा शंका दाटून येते. ताज्या भाजीत भेसळ आहे का? हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण भेसळ किंवा इंजेक्शनद्वारे पिकवलेली फळे आणि भाजीपाला गंभीर आजाराचा धोका निर्माण करू शकतो.
ज्यामध्ये प्रामुख्याने कर्करोगाचा आजार. तुम्ही पौष्टिक भाज्यांऐवजी रसायनयुक्त पदार्थ खात आहात की नाही हे तपासण्यासाठी FSSAI ने एक व्हिडिओ जारी केला आहे ज्याद्वारे तुम्ही भाजी खोटी आहे की खरी हे ओळखू शकता.
मलाकाइट ग्रीन म्हणजे काय ?
मॅलाकाइट ग्रीन हे रसायनाचा एक प्रकार आहे. त्याच्या वापराने भाज्या एकदम ताज्या आणि चमकदार दिसतात. हे प्रामुख्याने अँटीफंगल आणि अँटी-प्रोटोझोल औषध म्हणून वापरले जाते. परंतु नफा मिळविण्यासाठी भाज्यांमध्ये मॅलाकाइट ग्रीन मिसळले जाते.
FSSAI ने जारी केलेला व्हिडिओ -
FSSAI ने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये खरी आणि बनावट भाजी कशी ओळखायची हे दाखवण्यात आले आहे
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.