गोड आणि रसाळ फळ द्राक्ष जी सर्वांनाच आवडते. सध्या बाजारपेठेत बऱ्याच प्रकारची द्राक्षे आढळतात. जांभळे, काळे, हिरवे, पिवळे. आज काळ्या द्राक्षांचे काही वैशिष्टये जाणून घेऊ या. हे द्राक्ष खाण्यातच चविष्ट नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तसेच त्वचेसाठी देखील चांगले मानले जाते. हे हृदयरोगाशी लढण्यात खूप फायदेशीर आहे. या मध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट, हार्ट अटॅक, रक्त जमणे या सारख्या समस्यांपासून संरक्षण करतात. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. या मध्ये ग्लुकोज, मॅग्नेशियम, सायट्रिक ऍसिड सारखे पोषक घटक आढळतात, जे शरीराला आजारापासून वाचविण्यात मदत करतात. लठ्ठपणासारख्या समस्या त्रास देतात तर द्राक्ष या साठी फायदेशीर आहे. काळ्या द्राक्षाचे सेवन केल्यानं वाढत्या वजनाला नियंत्रित केले जाऊ शकते. चला तर मग काळ्या द्राक्षाच्या सेवन केल्याने मिळणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊ या.
1 स्मरणशक्ती-
काळे द्राक्ष स्मरणशक्ती वाढविण्याचे काम करतात. जर आपण नियमितपणे आपल्या आहारात ह्याचा समावेश करता, तर या मुळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूच्या क्रियाकलापां मध्ये सुधारणा होते.
2 मधुमेह -
काळ्या द्राक्षांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. द्राक्षांमध्ये रेसवर्टाल नावाचा पदार्थ असतो जो रक्तामध्ये इन्स्युलिन वाढविण्याचे काम करतो. या द्वारे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
3 कोलेस्ट्राल -
काळ्या द्राक्षांच्या सेवनाने कोलेस्ट्राल नियंत्रित केले जाऊ शकते. काळ्या द्राक्षांमध्ये असलेले सायटोकेमिकल्स हृदयाला निरोगी ठेवत, एवढेच नव्हे तर हे हृदयरोगाचा धोका कमी करण्यात उपयुक्त मानले जाते.
4 केस -
केसांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाणारे काळे द्राक्ष. ह्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते. काळ्या द्राक्षाचे सेवन डोक्यातील कोंडा, केसांची गळती होणं किंवा केस पिकणे किंवा पांढरे होणे या सारख्या समस्यां पासून मुक्त होण्यात मदत करतो.
5 वजन कमी करण्यात -
वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात काळे द्राक्ष समाविष्ट करू शकता. या मध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरातील विषारी टॉक्सिन्स बाहेर काढण्यात मदत करतात.