rashifal-2026

नऊ तासांपेक्षा जास्त झोप घातक

Webdunia
निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर तो तुमच्या हृदयाच्या आजारांचा संकेत असू शकतो आणि ते अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शास्त्रज्ञांनी झोप आणि हृदयासंबंधी हालचालींवर केलेल्या 74 अध्ययनांच्या समीक्षेनंतर असा निष्कर्ष काढला आहे की, जे लोक दिवसातून दहा तास झोप घेतात, त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता आठ तास झोपणारांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढते. या अध्ययनांमध्ये 33 लाख लोकांच्या माहितीचा समावेश करण्यात आला होता. उशिरापर्यंत म्हणजे नऊ तासांपेक्षा जास्त झोपणार्‍या लोकांमध्ये कार्डियोवॅस्कुलर डिसिज म्हणजे ह्रदयासंबंधी आजार होण्याचा धोका 50 टक्के जास्त दिसून येतो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, सात तासांपेक्षा कमी झोपणार्‍या लोकांमध्ये अकाली मृत्यू वा हृदयाचा धोका आढळून आला नाही. मात्र गरजेपेक्षा जास्त झोप आरोग्यासाठी घातक का असते, हे अद्याप शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले नाही. मात्र कमी झोप व जास्त झोपेचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, यावर ते सहमत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

वजन वाढणे आणि श्वासाच्या त्रासावर प्रभावी आहे अर्धचक्रासन, फायदे जाणून घ्या

नैतिक कथा : चिमणी आणि झाडाची गोष्ट

अगदी ढाब्यासारखी चव आणि बनवायलाही खूप सोपी Malai Egg Curry Recipe

Kick Day wishes 2026 in Marathi किक डे स्पेशल: प्रेमात 'किक' देण्याच्या मजेदार आयडिया आणि मेसेजेस

शिवजयंती २०२६: महाराजांच्या या ५ किल्ल्यांचा थरारक इतिहास तुम्हाला माहिती आहे का? एकदा नक्की वाचा

पुढील लेख
Show comments