असे म्हणतात कि एका निरोगी शरीरातच निरोगी मेंदू असते. कारण शरीर आणि मनाचा खूप खोल संबंध आहे म्हणून मनाला आनंदी ठेवणं महत्वाचे आहे. या साठी दररोज चालणे वॉक ला जाणे महत्त्वाचे आहे. या मुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त आणि उर्जावान राहते.
चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे चालावे या मुळे मधुमेह आणि इतर आजार आणि हृदयाच्या विकारांना दूर ठेवले जाऊ शकते. तसेच योग्य आहार घेणं देखील महत्वाचे आहे.
वाढत्या वयासह गुडघे देखील चांगले राहतात-
वॉक केल्यानं शरीरासह वाढत्या वयामुळे होणारा गुडघ्याच्या त्रास देखील कमी होतो. या मुळे गुडघे देखील फिट राहतात. या मुळे शरीर देखील उर्जावान होतो म्हणून दररोज आवर्जून चालावे. जेणे करून आजार आपल्यापासून लांब राहील आणि सरत्या वयात देखील तारुण्य कायम राहील.