Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पारिजातकांच्या फुलांचे 5 आश्चर्यकारक फायदे.....

पारिजातकांच्या फुलांचे 5 आश्चर्यकारक फायदे.....

अनिरुद्ध जोशी

, बुधवार, 15 एप्रिल 2020 (11:27 IST)
पारिजातकाच्या फुलांना हरसिंगार आणि शेफालिका असेही म्हणतात. इंग्रजीत याला नाईट जस्मिन आणि उर्दूमध्ये गुलजाफ़री असे संबोधिले जाते. या फुलांचे 5 रहस्य जाणून घेऊ या....
 
1 चीर तारुण्य -
 पौराणिक मान्यतेनुसार पारिजातकाच्या झाडाला स्वर्गातून पृथ्वीवर आणल्याचे समजले जाते. नरकासुराच्या वध केल्यावर श्रीकृष्ण स्वर्गात गेलेले असताना इंद्राने त्यांना पारिजातकाचे फूल दिले. कृष्णाने ते फूल देवी रुक्मिणीला दिले. देवी सत्यभामाला देवलोकाची देवमाता अदितीने नेहमीसाठीचे चिरतारुण्य राहण्याचे वर दिले. तेवढ्यात नारद तिथे आले आणि त्यांनीही सत्यभामेला पारिजातकाची महत्ता सांगितली. त्या प्रभावामुळे देवी रुक्मिणीपण चिरतारुण्यवती झाली. सत्यभामेला हे केल्यावर त्या क्रोधीत झाल्या. त्यांनी श्रीकृष्णाकडून पारिजातक वृक्ष घेण्याचा आग्रह धरला. अशी आख्यायिका आहे की पारिजातकाचा वृक्षाचा उगम समुद्र मंथनाच्या वेळेस झाला होता. ज्याला इंद्राने आपल्या बागेत लावले होते.
 
2 ताण कमी करते - 
पारिजातकाच्या फुलांमध्ये ताण दूर करण्याची शक्ती असते. जीवनात हे आनंद पसरवते. त्याचा सुगंधामुळे मेंदूला शांतता मिळते. 
 
3 थकवा निवळतो -
पारिजातकाची फूले रात्रीच्या वेळी उमलतात आणि सकाळी कोमजतात. अशी आख्यायिका आहे की पारिजातकाला स्पर्शमात्र केल्यानेच अंगातला सर्व थकवा दूर होतो. 
 
4 शांती आणि समृद्धी वाढते -
हरिवंश पुराणात या झाडाविषयाचीआणि फुलांची विस्तृत माहिती दिली आहे. ह्या फुलांच्या उपयोग लक्ष्मी पूजनेसाठी केला जातो. झाडांवरूनही फूले आपोआप खाली पडतात आणि ज्या अंगणात ही फूले पडतात तेथे नेहमी शांती आणि समृद्धी नांदते.
 
5 हृदयविकाराचा रोगांवर फायदेशीर - 
पारिजातक हृदयाच्या विकारांमध्ये फायदेशीर असते. 15 ते 20 फुलांचा रस घेणे हृदयासाठी फायदेशीर असते. हृदयरोग रोखण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग आहे. हा उपाय डॉक्रांच्या सल्ल्याने करायला हवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कविश्रेष्ठ आणि थोर साहित्यकार ग. दि. माडगूळकर